Chhagan Bhujbal  esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: प्रकृती बिघडली; छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल

सकाळ डिजिटल टीम

नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ आज सकाळीं बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Chhagan Bhujbal admitted to bombay hospital )

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील काही दिवसांपासून रुग्णालयात होते. आजच त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज छगन भुजबळ रुग्णलयात दाखल झाले आहेत. भुजबळ गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमात मास्क वापरत असल्याचे दिसून येत होते.

आज अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून ते मास्क वापरात आहेत. त्यानंतरच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्या कार्यक्रमांत त्यांनी मास्क वापरत होते. छगन भुजबळ यांचा 75 वा वाढदिवसा दरम्यान भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्या दरम्यान अनेकांच्या भुजबळ संपर्कात आल्याने आठ ते दहा दिवस भुजबळ आजारी होते. त्यावेळी देखील भुजबळ काही दिवस मुंबईत उपचार घेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT