Chhagan Bhujbal sakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : ‘त्या’ फाेनमुळे बैठकीवर बहिष्कार;भुजबळ यांचा विरोधकांवर आरोप,शरद पवार यांच्यावर टीका

‘‘राज्यात आरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी राज्य सरकारने यासंदर्भात बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला यायला हवे होते.

सकाळ वृत्तसेवा

बारामती : ‘‘राज्यात आरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी राज्य सरकारने यासंदर्भात बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला यायला हवे होते. सगळे विरोधक त्या बैठकीला येणार होते, पण पाच वाजता बारामतीहून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला,’’ अशा शब्दांत आरक्षणाच्या मुद्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी आज बारामतीतून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बारामतीत आयोजित जनसन्मान मेळाव्यात भुजबळ बोलत होते.

ते म्हणाले, की राज्य सरकारने मुंबईत चार दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्यावर बैठक बोलाविली होती. त्या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहावे, असा प्रयत्न होता. यामागे वातावरण शांत व्हावे असा प्रयत्न होता. यात मी स्वत: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दूरध्वनी केला, आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही फोन करून काहीही करा पण शरद पवार यांनाही या बैठकीला बोलवा, असे सांगितले होते. विरोधक या बैठकीला येण्यास तयारही झाले होते. मात्र, बैठकीच्या दिवशी पाच वाजता बारामतीतून कुणी तरी त्यांना फोन केला आणि विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी जे आरक्षण देऊ केले होते, त्याची अंमलबजावणी शरद पवार यांनी केल्यामुळे आम्ही त्यांचे आभारही मानले होते, असा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.

बारामतीत सर्वच समाजाचे मतदार आहेत. खासदार सुनेत्रा पवार यांच्याप्रमाणेच त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंनाही मते दिली आहेत, या सर्वांचे संरक्षण करण्याचे काम तुमचे नाही का, असा सवाल करत भुजबळ म्हणाले, ‘‘तुमचा राग छगन भुजबळ, अजित पवार यांच्यावर असेल पण ओबीसी समाजाने तुमचे काय घोडे मारले आहे. आरक्षणाचा वाद मिटविण्यासाठी का तुम्ही या बैठकीला आमच्यासोबत येत नाही, नंतर पाठीमागून सल्ले द्यायचे, राज्य पेटविण्याचे उद्योग सध्या सुरु आहेत. निवडणुकीच्या काळात एकमेकांविरुद्ध लढू पण राज्यातील सामाजिक प्रश्न सोडविताना मुद्दाम त्याच्यावर बहिष्कार टाकायचा, चर्चेला यायचेच नाही आणि ओबीसी व मागासवर्गीयांना वाऱ्यावर सोडायचे, हे अजिबात योग्य नाही. अशा प्रश्नावर सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. भुजबळ यांनी आरक्षणाचा विषय काढताच सभेत उपस्थित मराठा युवकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा दिल्या.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपापसांत भांडणे, मारामाऱ्या व्हाव्यात, असा काही लोकांचा प्रयत्न आहे. आमची भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गानेच आम्ही जाणार आहोत, फक्त ज्यांना आरक्षण मिळाले आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, एवढी काळजी फक्त घ्यावी.

-छगन भुजबळ, मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT