Chhagan Bhujbal sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : ''हो.. बंडाच्या दिवशी मी पवार साहेबांशी खोटं बोललो'' छगन भुजबळांनी स्पष्टच सांगून टाकलं

संतोष कानडे

मुंबईः ज्या दिवशी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेमध्ये बंड करुन सत्तापक्षाला समर्थन दिलं त्या दिवशी छगन भुजबळ हे बघून येतो म्हणून गेले आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी आपण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी खोटं बोललो, असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.

छगन भुजबळ यांनी 'टीव्ही ९ मराठी'ला एक मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी अनेक खुलासे केले. जेव्हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शरद पवारांनी राजीनामा दिला होता, त्यासंबंधीची आपल्याला काहीच माहिती नव्हती. मात्र अजित पवारांना ते सगळं माहिती होते, असं भुजबळ म्हणाले.

महत्त्वाचे म्हणजे ज्या दिवशी अजित पवारांनी बंड करुन मंत्रिपदाची शपथ घेतली त्या दिवशी आपण लोणावळ्याला आहे, असं खोटं सांगितल्याची कबुली छगन भुजबळ यांनी दिली. २ जुलै रोजी नेमकं काय झालं, याबद्दल भुजबळांनी खुलासा केला आहे.

छगन भुजबळ मुलाखतीत म्हणाले की, मी तिकडे काय चाललंय हे बघण्यासाठी गेलो आणि मंत्रिपदाची शपथ घेऊन आलो, असं शरद पवार म्हणतात. ते खरंच आहे. जेव्हा मला सुप्रियाताईंचा फोन आला तेव्हा खोटं बोलत लोणावळ्याला आल्याचं सांगितलं.

भुजबळ पुढे म्हणाले की, शरद पवार साहेबांचा फोन आल्यानंतरही मी घरात असतानाही लोणावळ्याला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले अध्यक्षपदाबाबत नंतर निर्णय घ्यायचा असताना आता कशाला सगळे जमले आहेत. मात्र मी काही सांगितलं नाही.

''त्यानंतर साडेअकरा वाजता मी देवगिरी येथे गेलो. तिथे सुप्रियाताईंशी चर्चा झाली. परंतु त्यांना या प्रकाराबाबत माहिती नव्हती. थोड्या वेळाने त्यांना सगळी हकीकत कळली. भाजपसोबत जाण्यासंबंधीची चर्चा एक-दीड महिन्यापासून सुरु होती तरीही कुणाला कळलं नव्हतं'' असं सांगत भुजबळांनी त्या दिवशी खोटं बोलल्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT