Chhagan Bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : ''मी आमदार झाल्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झालाय'' छगन भुजबळ रोहित पवारांवर संतापले

संतोष कानडे

मुंबईः अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी पहिली सभा येवल्यात घेतली होती. त्या सभेत त्यांनी छगन भुजबळांवर काही आक्षेप नोंदवले. त्याला भुजबळांनी उत्तरही दिली. मात्र रोहित पवारांनी या वादात उडी घेऊन नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.

रोहित पवारांनी छगन भुजबळांवर टीका केली होती. शरद पवारांनी आणि पक्षाने छगन भुजबळ यांना मोठं केलं परंतु ते विसरले, अशा आशयाची टीका त्यांनी केली. त्याला छगन भुजबळ यांनी इतिहास सांगून उत्तर दिलं.

भुजबळ म्हणाले की, मी १९८५ मध्ये महापौर आणि आमदार झालो होतो. तुमचा जन्म त्यानंतर चार महिन्यांनी झाला. त्यामुळे मला मोठं केलं, अशा गोष्टी करु नका. तुम्हाला आत्ताच काही जास्त बोलत नाही. मात्र तुमच्या मतदारसंघात जावून उत्तर देईल, असं भुजबळ म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अजित पवार आणि तुम्ही पवार घराण्याने ठरवून साहेबांचा राजीनामा घ्यायचं ठरवलं. त्याबद्दल आम्हांला सांगितलं होतं का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

शरद पवारांना सभेतूनच उत्तर देण्याविषयी भुजबळांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, आठ दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही असं काही जण म्हणत आहेत. परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये तर महिन्याभरानंतर शपथविधी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WhatsApp New Update : व्हॉट्सॲपने बदलली फोटो-व्हिडिओ पाठवायची पद्धत! आता आलंय नवीन फीचर, पाहा कसं वापरायचं?

इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले! मुंबईत भाजीपाला, दूध आणि प्रवास महागला; घरखर्चात मोठी वाढ

MI vs RR: वैभव सूर्यवंशी, पराग फेल; पण जडेजाचा फिनिशिंग टच अन् राजस्थान रॉयल्स २०० धावा पार; मात्र मुंबई इंडियन्स करणार गेम?

Fuel Crisis: पेट्रोल-डिझेलसोबत आता CNG-LNG डिस्पेंसर तपासणी व्यवस्था बदलणार! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नवे नियम लागू

Ratnagiri Crime News : ‘तू त्याचा नाद सोडून दे,’ असा सल्ला मैत्रिणीला दिला अन्, सोहम कट रचून सूरजचा काढला काटा

SCROLL FOR NEXT