महाराष्ट्र बातम्या

जोशीच भविष्य सांगायचे, पण आता पाटीलही सांगायला लागले; भुजबळांचा टोला

महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या सोमय्या आणि पाटलांचा भुजबळांनी घेतला समाचार

सुधीर काकडे

राज्यात मागच्या काही काळात घडणाऱ्या हालचालींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रोज आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. तसंच चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) हे सरकार पडेल असं म्हटलं आहे. त्यावर बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमय्या आणि पाटील या दोघांच्याही वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.

कोरोना काळात पुण्यात तयार करण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचे कंत्राट मुंबईतील एका चहावाल्याला देण्यात आला असून, सदरील व्यक्ती संजय राऊत यांच्या जवळची असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीत हा कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला. त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सोमय्या रोज काही तरी बोलत असतात. काही तरी आरोप करत असतात. मुख्यमंत्री असे काही धंदे करत नाही. एखाद्या ठिकाणी काही झालं असेल तर तो अपघात असू शकतो.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सरकार पडणार आहे असं वक्तव्य केलं होतं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करा अशी मागणी काही लोकांनी महिन्याभरापूर्वी केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते, पाटील कधीपासून भविष्य सांगायला लागले? मला तर आश्चर्य वाटतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT