chhagan bhujbal
chhagan bhujbal 
महाराष्ट्र

भुजबळ यांना विशेष काळजी घेण्याचा पवारांचा सल्ला

सकाळवृत्तसेवा

मुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी विशेष काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी भुजबळ यांना दिला.

भुजबळ आज सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरुन शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. या भेटीत राजकीय नाही तर प्रकृतीसंदर्भात चर्चा झाली. शरद पवार यांनी वडीलकीच्या नात्याने आपली विचारपूस केली. शिवाय, विशेष काळजी घ्या, असेही पवारांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्याची माहिती माझ्या निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला फोन आल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली होती. छगन भुजबळ यांना गुरुवारी (ता. 10) केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील 'महाराष्ट्र सदन' गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे.

यावेळी भुजबळ म्हणाले होते की, 'मला डॉक्टरांनी आराम करण्याच्या अटीवर डिस्चार्ज दिला आहे. लवकरच मी उपचार करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना हजर राहणार आहे. जामीन मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर मला पहिला फोन पवारसाहेबांचा आला. सत्य सर्वांसमोर येईल, ज्यामुळे मला तुरुंगवास झाला. त्या महाराष्ट्र सदनाचा सर्व जण लाभ घेत आहेत, याचा मला आनंद आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT