chhagan bhujbal
chhagan bhujbal esakal
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : भाकरी फिरवा पण कच्ची राहणार नाही ही काळजी घ्या, भुजबळांना नेमकं सांगायचंय काय?

सकाळ डिजिटल टीम

नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबीर नागपूर येथे होत आहे. या शिबिरामध्ये छगन भुजबळ यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी भुजबळांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नाविषयी आवाज उठवला.

छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजासाठी काम उभं करण्याची गरज आहे. या समाजासाठीच मी शिवसेना सोडली होती. कारण शरद पवार हे ओबीसींसाठी काम करत होते. ओबीसींसाठी देवेंद्र फडणवीस यांनी कायदा बनवला परंतु तो टिकला नाही. एसीमध्ये बसून त्यांच्या लोकांनी इम्पेरिकल डेटा बनवला. त्यामुळे उपयोग झाला नाही.

ओबीसी समाजाची जनगणाना झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. एससी, एसटी समाजाला निधी मिळतो, तसंच ओबीसींनाही मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं भुजबळ म्हणाले.

भाकरी फिरवण्याच्या मुद्द्यावर बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, ईश्वर बालबुद्धे यांनी ओबीसी सेलमध्ये चांगलं काम केलं आहे. परंतु त्यांनी अध्यक्षपदावर दुसऱ्याला नेमले. भाकरी फिरवण्यासाठी त्यांनी असं केलं परंतु भाकरी कच्ची राहणार नाही, हेही बघितलं पाहिजे. असं म्हणून भुजबळांनी चर्चा घडवून आणली आहे.

शरद पवार यांनी ओबीसी समाजासाठी मोठं काम उभं केलं. बाकीचे पक्ष केवळ नावाला आहेत. पवारांनी मात्र फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा पुढे नेल्याचं भुजबळ म्हणाले. मराठा आणि दलित समाजातील मुलांना वसतिगृह उपलब्ध नसेल तर ७००० रुपये दिले जातात. तशाच पद्धतीने ओबीसींना द्या. शिवाय ओबीसींसाठी वसतिगृह उभारण्याची मागणी भुजबळ यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT