Chhagan Bhujbal Eknath Shinde Shiv Sena  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: जागावाटप घालणार महायुतीत घोळ? जेवढ्या जागा शिंदेंना तेवढ्याच आम्हालाही हव्या; भुजबळ आक्रमक

Maha Yuti: आता छगळ भुजबळ यांनीही याच मुद्द्यावर भाष्य केल्याने महायुतीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

आशुतोष मसगौंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मुंबईमध्ये कार्यक्रम पार पडला. यामध्ये पक्षाचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत जेवढ्या जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील तेवढ्या जागा आम्हालाही हव्या अशी आक्रमक मागणी केली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीला आणखी सहा महिने बाकी आहेत. त्याआधीच महायुतीतील पक्ष जागा वाटपावर भाष्य करत आहेत. अशात आता छगळ भुजबळ यांनीही याच मुद्द्यावर भाष्य केल्याने महायुतीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, "मी मागे जागावाटपाबाबत बोलल्यानंतर लगेचच त्यांनी माझ्याविरोधात बोलायला सुरुवात केली. मात्र, जागावाटपाचा निर्णय लवकर घ्यायला हवा. माहित आहे भाजप मोठा भाऊ आहे, मोठा पक्ष आहे. पण आमचे जेवढे आमदार आहेत, तेवढेच आमदार शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे त्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आपल्यालाही मिळायला हव्यात."

(बातमी अपडेट होत आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT