Chhagan Bhujbal OBC melava Hingoli 
महाराष्ट्र बातम्या

शिंदे समिती रद्द करा, कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या; छगन भुजबळांची मोठी मागणी

Sandip Kapde

Chhagan Bhujbal OBC melava Hingoli: महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी, असा वाद रंगला आहे. हिंगोलीत ओबीसींचा मेळावा पार पडला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसींचा सर्वात मोठा चेहरा छगन भुजबळही या सभेत सहभागी झाले होते. सभेला संबोधित करताना छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनावर जोरदार निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी पलटवार केला. जरांगे पाटील सभांमधून भुजबळांवर निशाणा साधत आहेत. त्याला भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले.

सारथीला जे मिळालं ते ओबीसींना द्या-

सारथीला जे मिळालं ते ओबीसींना द्या. तसेच सापडलेल्या कुणबी नोंदींना स्थगीती द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडे केली.

२ ते ३ कोटी कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या. उपोषण करणाऱ्या नेत्यांसोबत फिरणाऱ्या ३-४ लोकांना पकडलं आहे. पोलिसांना तयार केलेले एफआयआर माझ्याकडे आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण जाळपोळीसारख्या कृत्यांना माझा विरोध असल्याचे भुजबळ म्हणाले.

गावबंदीचे बॅनर काढा-

मराठा समाजाने गावागावात लागलेले गावबंदीचे बॅनर काढावे. रोहित पवार, राजेश टोपे यांचे स्वागत करता. मात्र इतर नेत्यांना गावबंदी करता?. गावबंदी करणे कायद्याने गुन्हा आहे. एक महिना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे भुजबळ म्हणाले.

आएएस, आयपीएसमध्ये मोठ्या टक्क्यानं मराठे-

मनोज जरांगे पाटील आमची लायकी काढतात. लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागते, असे जरांगे म्हणाले होते. याचा भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. महात्मा फुलेंची लायकी होती म्हणून त्यांनी शिवरायांची समाधी शोधली. शिवरायांचा दुसरा पोवाडा अमरशेख यांनी रचला. आएएस, आयपीएसमध्ये मोठ्या टक्क्यानं मराठे आहेत. मंत्रालयात कॅडरमध्येही मोठ्या टक्केवारीनं मराठे आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.

मराठा समाजाचं एकट्याचं सर्वेक्षण चालणार नाही-

यावेळी छगन भुजबळ यांनी महत्वाच्या मागण्या केल्या. जे सारथीला मिळालं ते महाज्योतीला द्या. शिंदे समिती ताबडतोब रद्द करा. दोन महिन्यात मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या, मराठा समाजाचं एकट्याचं सर्वेक्षण चालणार नाही. सर्वांच सर्वेक्षण करा. मराठा समाज मग इतरांपेक्षा मागास असेल तर त्यांना आरक्षण द्या. मंडल आयोगाने सांगितलं आम्ही ५४ टक्के आहोत. बावनकुळे, पवार साहेब, अजीतदादा म्हणतात जणगनना करा... मग करा जणगनना एकदाची. होऊन जाऊ द्या दुध का दुध पाणी का पाणी, असे छगन भुजबळ म्हणाले.

विठ्ठलाचा आणि आरक्षणाचा संबंध काय?-

धंद्याची जात न सांगता. मराठा जात सांगावी. तुम्ही सर्व मराठा समाजाला कुणबी करणार. राज्यात एकही मराठा शिल्लक राहणार नाही. पंढरपूरला येऊ नका असं सांगता. देवेंद्र फडणवीस यांना येऊ देणार नाही असं म्हणाले होते. देव सर्वांचा आहे. विठ्ठलाच्या पुजेला विरोध का? विठ्ठलाचा आणि आरक्षणाचा संबंध काय?, असा प्रश्न देखीळ छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

एकत्र आले तर काय चमत्कार करु शकता. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आली आहे. ओबीसींचा आवाज बुलंद करा. मला बोलवा किंवा नाही. आमदारकीची हाऊस नाही. मंत्रिपदाची हाऊस नाही. गरिब मराठा समाजाला आरक्षण द्या, आमच्यावर बुलडोझर नको, असे देखील भुजबळ म्हणाले.

EWS मध्ये ७८ टक्के मराठा समाज लाभार्थी-

EWS मध्ये ७८ टक्के मराठा समाज लाभार्थी आहे. EWS नुसार ८५ टक्के मराठा समाजाच्या नियुक्त्या आहेत. ओबीसी प्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना ५० टक्के फी सवलत आहे. जे मराठा समाजाला दिलं ते ओबीसी समाजाला मिळावं. ओबीसींच्या हाताखाली काम करणं शोभत नाही असं नवीन नेते (मनोज जरांगे) म्हणाले. आमची लायकी काढली. आमची लायकी होती म्हणून शिवरायांसाठी लढलो. मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण देऊ नका. माझा जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध. मराठा समाजाला नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT