Minister Chhagan Bhujbal sakal
महाराष्ट्र बातम्या

OBC आरक्षणावरून 'वर्षा'वर मविआची बैठक; भुजबळ म्हणाले...

ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली

दत्ता लवांडे

मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भातील महाविकासआघाडीची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पार पडली आहे. त्यानंतर इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम अजून पूर्ण झालं नाही असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. कुठल्याही परिस्थिती ओबीसीवर अन्याय होता कामा नये असं आम्ही सांगितलं आहे असं ते म्हणाले.

(Chhagan Bhujbal On OBC Reservation And Empirical Data)

"दरम्यान आडनावावरून ओबीसीच्या इम्पेरिकल डेटा गोळा करण्यास अडचणी येत आहेत. ही गफलत आम्ही त्यांची लक्षात आणून दिली आहे. पण इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठीचे सर्वेक्षण थांबवण्यात येणार नाही." असं त्यांनी सांगितलं आहे.

इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासंदर्भातील सर्वेक्षणातील सर्व बाबी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या आहेत. आरक्षण न मिळाल्यास मध्यप्रदेशप्रमाणे जनगणना करावी लागणार आहे." असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या असून ओबीसी आरक्षणासाठी लागणाऱ्या इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम चालू आहे. त्यासंदर्भातील महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली आहे. त्यामध्ये सर्वेक्षणातील गफलती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृ्त्यू

SCROLL FOR NEXT