Chhagan Bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

जालन्यातील प्रकरणावर छगन भुजबळांनी मांडली रोखठोक भुमिका; म्हणाले, 'काल झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी...'

चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल (शुक्रवारी) पोलिसांनी अमानुष लाठीमार केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामध्ये आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल (शुक्रवारी) पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. तर मराठा समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यादेखील या घटनेवर प्रतिक्रिया समोर येत आहेत.

अशातच संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने आरक्षणाबाबत कुठल्याही हालचाली केल्या नाहीत. शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज झाला, सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजवबळ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणालेत छगन भुजबळ?

मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आम्ही सर्वजण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत! राज्यात होणाऱ्या शांततामय आंदोलनास आम्हा सर्वांचा पाठींबा आहे.

काल जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधव शांततेत आंदोलन करत होते. त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्या व बळाचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. काल झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची ठाम भूमिका आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तसे निर्देश दिले आहेत. मी राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो व या लढाईत आम्ही सारे मराठा आंदोलकांसोबत आहोत, असे आश्वासित करतो!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT