Chhagan Bhujbal Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: शरद पवारांच्या माफीनाम्यावर भुजबळांचा सवाल, 'पवार साहेब तुम्ही किती ठिकाणी माफी मागणार आणि..'

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांवर केला घणाघात

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. तर अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासोबत इतरही राष्ट्रवादीचे नेते, आमदार त्यांच्यासोबत गेले.  (Marathi Tajya Batmya)

शरद पवार यांच्या जवळचे नेते प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ या तीन नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर शरद पवार अॅक्शन मोडमद्धे आले आहेत. पुन्हा पक्ष बांधणी करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेत त्यांनी काल छगन भजबळ यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिक येवले येथे जाहीर सभा घेतली. (Marathi Tajya Batmya)

यावेळी बोलताना शरद पवार यांनी जनतेची माफी मागितली. या सभेत त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केली. माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला याची मी माफी मागतो असं शरद पवार म्हणाले, त्यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना खोचक सवाल केला आहे. (Marathi Tajya Batmya)

छगन भुजबळ बोलताना म्हणाले कि, 'शरद पवारांनी माफी का मागितली हे मला समजलं नाही. त्यांनी सगळ्या सभा रद्द केल्या. पण येवल्यातील सभा रद्द केली नाही. मी ओबीसीचा नेता आहे, म्हणून ते इथे पहिल्यांदा आले. मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागता. किती ठिकाणी माफी मागणार आहात. गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत, पुण्यापासून बीडपर्यंत आणि खाली लातूरपर्यंत माफी मागणार आहात का?', असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना केला आहे.(Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT