Chhagan Bhujbal News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: गुगलीत स्वत:च्या प्लेअरला आऊट करायचं असतं का? छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल

Bhujbal in Beed:'तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार', शरद पवारांच्या येवल्यातील प्रश्नाला छगन भुजबळांचा बीडमध्ये प्रतिप्रश्न.

सकाळ डिजिटल टीम

Chhagan Bhujbal on Sharad Pawar:राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार सत्तेत सामील झाल्यावर शरद पवार यांनी महाराष्ट्रात पक्षबांधणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेतली होती. त्यानंतर अजित पवार गटातील नेते आणि शरद पवार गटातील नेत्यानंतर द्वंद्व सुरु झाले.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेऊन बंडखोर नेत्यांवर टीका केली होती. छगन भुजबळ यांनी रविवारी (दि.२७ ऑगस्ट) बीडमध्ये अजित पवारांनी घेतलेल्या सभेत शरद पवारांवर पलटवार केला. अनेकवर्ष शरद पवारांसोबत असलेल्या छगन भुजबळांनी या सभेत शरद पवारांनी केलेल्या चुकांचा पाढा वाचून दाखवला.

यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. छगन भुजबळ यांंनी या सभेत पहाटेच्या शपतविधीबद्दलही भाष्य केले. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, "दादांनी सकाळी शपथविधी घेतला, तर म्हणे गुगली होती … राजकारणात अशा गुगली असते का ? गुगलीत स्वत:च्या प्लेअरला आऊट करायचं असतं का?"

शरद पवारांनी जेव्हा येवल्यात सभा घेतली होती, तेव्हा त्यांनी येवल्यातील जनतेची माफी मागितली होती. यावर भुजबळ म्हणाले की, "साहेब म्हणतात… माझी चूक झाली, माफी मागतो. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागाची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल."(Latest Marathi news)

"जेव्हा काँग्रेसमधून तुम्हाला बाहेर काढण्यात आलं तेव्हा छगन भुजबळ पहिला माणूस होता, जो तुमच्यासोबत होता. अनेकांनी फोन करुन सांगितलं की शरद पवारांसोबत जाऊ नका, तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो."

बीडमध्ये झालेल्या या सभेत छगन भुजबळ यांनी ईडीच्याही मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले की,"आमच्यावर ईडीची कारवाई झाली, आम्ही आत गेलो आणि बाहेर येऊन पुन्हा तुमच्यासोबत पुन्हा उभे राहिलो. आम्ही ईडीला घाबरत नाही." यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर अनेक आरोपही केले. आता छगन भुजबळांच्या या वक्तव्यांवर शरद पवार काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. (Latest Marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT