Chhagan Bhujbal Reaction On Death threat over Maratha Reservation Manoj Jarange Patil Politics  
महाराष्ट्र बातम्या

ठार मारण्याच्या धमकीनंतर 'तुला मराठ्यांनी मोठं केलं' म्हणणाऱ्यांना भुजबळांचं प्रत्युत्तर; म्हणाले, मला मोठं केलं ते...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी ठार मारण्याची धमकी देण्यात आली. मराठा आरक्षणाला विरोध केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात त्यांना धमकावण्यात आले. धमक्यांना मी घाबरत नाही, समाजासाठी मेलो तर आनंदचं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

भुजबळ म्हणाले की, मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. एकदा नाहीतर अनेकवेळा येत आहेत. जीवंत राहणार नाही, तुझी वाट लावू आणि शिव्या देत आहेत. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाहीत. पोलिसांकडे तक्रार केली आहे पोलीस काय ते बघतील असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

शिवसेनेच्या जन्म झाला तेव्हापासून मी समाज कार्यात आहे. ओबीसी मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठे केले असे सांगून शिव्या देतात, मला मोठ केलं शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी... मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केलंय. माझं देखील काहीतरी योगदान आहे म्हणूनच मला संधी दिली असेल असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

तसेच पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच असल्याचे देखील बोलून दाखवले. मी एका जातीचे प्रतिनिधित्व करत नाही मी ओबीसी साठी काम करत आहे

जानकर यांनी मला समर्थन दिले मी त्यांचा आभारी आहे. सध्या तरी ओबीसी बचाव हे एकच आमचे काम आहे. राज्यात ओबीसी 54 टक्के पेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला वेगळे आणि टिकणारे आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांचे मी काय खाल्ले हे त्यांनी सांगावे आणि आता मनोज जरांगे पाटील कुणाचे खातोय हे त्यांनी सांगावे असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT