NCP Chhagan Bhujbal  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ''मला मंत्रिपदाचं अप्रूप नाही, मी ओबीसींसाठी...'', छगन भुजबळ आता थेटच बोलले

रसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देणे अशक्य असून याच्या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयात लढू असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.

रोहित कणसे

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून पेटलेला आहे. २० जानेवारी रोजी मराठा समाजाकडून मु्ंबई येथे आंदोलन केलं जाणार असून लाखोंच्या संख्येने नागरिक यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान मनोज जरांगे यांना राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विरोध केला जात आहे. तसेच सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देणे अशक्य असून याच्या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयात लढू असे भुजबळ म्हणाले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल असे म्हटले आहे. मात्र तरी देखील ओबीसी समाजाकडून होत असलेल्या आंदोलनाबाबत भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही मंत्री असून देखील तुमचा सरकारवर विश्वास नाही का? असा प्रश्न त्यांना विचारला असता भुजबळ म्हणाले की, मी मंत्री नंतर आहे, पहिल्यांदा माणूस आहे, तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिलं आहे. मी आमदार मंत्री नंतर... शिवसेना देखील ओबीसीच्या मंडल आयोगासाठी सोडली. त्या मंत्रिपदाचं, आमदारकी-खासदारकीचं मला कौतुक आणि अप्रूप देखील नाहीये. मी ओबीसीसाठी काम करतोय. त्यांना धक्का लागू नये. देशात ५४ टक्के लोक आहेत, त्यांच्यासाठी काम करतोय.

कशाला मोर्चा-आंदोलन करताय असं विचारत असाल तर पलिकडच्यांना पण तसं विचारा, जर ते धक्का न लावाता मराठा समाजाला देणार आहोत तर मग ते मुंबईला कशाला जात आहेत असेही भुजबळ यावेळी म्हणाले. सरसकट ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण आम्ही होऊ देणार नाही... रस्त्यावरची आणि सगळीकडची लढाई आम्ही लढू असेही भुजबळ म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावातून पायी मुंबईकडे रवाना होणार आहेत. ते अहमदनगर-पुणे मार्गे २६ जानेवारीपर्यंत मुंबईत पोहोचणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Theur Theft : महिला पोलिसाच्या घरांतच चोरट्यांनी केली हातसफाई; रोख रकमेसह ९ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने केले लंपास

Junnar Crime : विद्यार्थिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या आरोपी युवकाने झाडाला गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT