Chhagan Bhujbal  esakal
महाराष्ट्र बातम्या

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, बिहार सरकारने ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगनणा केली आहे, तसा सर्व्हे महाराष्ट्रातदेखील व्हायला पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे.

संतोष कानडे

Chhagan Bhujbal : ओबीसींच्या हक्कासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घ्यावी, अशी मागणी समता परिषदेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. मागे जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चर्चेत होतं, तेव्हाही भुजबळांनी ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी विरोधी गटाकडून होत होती.

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी समता परिषदेची बैठक झाली. बैठकीमध्ये ओबीसी, मराठा आंदोलन, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी, पार पडलेल्या लोकसभा निवडणुका या मुद्द्यांवर चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे देशात जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचं भुजबळांनी बैठकीनंतर सांगितलं.

बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी भुजबळांकडे वेगळी भूमिका घेण्याची मागणी केल्याचं कळतंय. 'साम टीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. वेगळी भूमिका म्हणजे सरकारमधून बाहेर पडून ओबीसींसाठी लढा उभा करावा, अशी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, बिहार सरकारने ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगनणा केली आहे, तसा सर्व्हे महाराष्ट्रातदेखील व्हायला पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे.

जातीनिहाय जनगणना केली तर...

जातीनिहाय जनगणना केली तर ओबीसींची संख्या आणि त्यांची परिस्थिती यांचा अंदाज येण्यास मदत होईल. केंद्र सरकारकडून एससी, एसटीला जसे वेगवेगळे फंड मिळतात, तसे फंड ओबीसींनाही मिळू शकतील. त्यामुळे हा सर्व्हे भारत सरकारकडून व्हायला पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT