परभणी - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने परभणीत शुक्रवारी झालेल्या बहुजन जागृती समता मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ व व्यासपीठावर मान्यवर.
परभणी - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने परभणीत शुक्रवारी झालेल्या बहुजन जागृती समता मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ व व्यासपीठावर मान्यवर. 
महाराष्ट्र

तुरुंगात डांबणाऱ्यांनो, तुम्ही काही संत नाही - छगन भुजबळ

सकाळवृत्तसेवा

परभणी - ‘मला तुरुंगात डांबले याची खंत नाही. खोटे आरोप लावणाऱ्यांनो, तुम्ही काही संत नाहीत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहात, हे विसरू नका,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुनावले. सरकारने आमच्या कुटुंबाचा नाहक छळ केला असून, महाराष्ट्र सदन बांधणाऱ्या कंत्राटदाराला अद्याप एकही रुपया दिलेला नसताना घोटाळा झाला कसा म्हणता, असा प्रश्न करीत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शुक्रवारी (ता. २५) येथे बहुजन जागृती समता मेळावा झाला. त्यावेळी भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, महापौर मीना वरपूडकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आमदार रामराव वडकुते, आमदार विजय भांबळे, माजी खासदार सुरेश जाधव, ॲड. गणेशराव दुधगावकर आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, मला तुरुंगात का टाकले हे मला आणि ज्यांनी टाकले त्यांनाही अजून माहीत नाही. महाराष्ट्र सदन बांधकामातील गैरव्यवहाराचे आरोप माझ्यावर करण्यात आले, त्या बांधकामाचे कंत्राट मी नव्हे, तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळाने दिले होते. माझी केवळ त्या खात्याचा मंत्री म्हणून भूमिका होती. सदन बांधून चार ते पाच वर्षे उलटली असताना अद्याप कंत्राटदाराला एक रुपयाही दिलेला नाही. त्यामुळे माझ्यावरचा आरोप बिनबुडाचा आहे. 

नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंवर टीका
देशात अराजकता माजली असल्याचे सांगत भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची नक्कल करीत त्यांच्यावर टीका केली. पहारेकरी चोर आहेत, असे म्हणता तर त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता, अशी विचारणा करीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही तोफ डागली. चारा छावण्यांची मागणी केली असता, दिल्या काय तर, लावण्या, असे म्हणत त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचाही समाचार घेतला.

कपडे सोडून सगळे जप्त केले
तुरुंगात टाकल्यानंतर चौकशीच्या नावाखाली भुजबळ कुटुंबाचा अतोनात छळ करण्यात आला. कपडे सोडून सगळे काही जप्त केले, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. तुम्ही कितीही दादागिरी करून संपवायला निघालात तरी भुजबळ संपणार नाही, हे ध्यानात घ्या, असेही ते म्हणाले. यावेळी भुजबळ यांनी मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT