महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील कुणबी प्रमाणपत्र घेणार का?, छगन भुजबळांचा थेट निशाणा

छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचा तिसरा मेळावा इंदापूरमध्ये होत आहे.

संतोष कानडे

इंदापूरः छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचा तिसरा मेळावा इंदापूरमध्ये होत आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळांनी कुणबी प्रमाणपत्रावरुन हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर महाराष्ट्रात मराठा उरणार नाहीत, असं भुजबळ म्हणाले.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आपली सभा रात्री १० वाजता बंद होते. त्यांची रात्री १२ ला, २ ला बंद होते. त्यांना परवानगी आहे की नाही, हे माहिती नाही. पोलिस कारवाई करत नाहीत. ते म्हणतील तो कायदा. कायदा फक्त तुम्हाला आणि म्हणाला. ते काहीही बोलले तरी त्यांच्या बातम्या छापून येणार. मी पंधरा दिवसांनंतर बोललं तरी वातावरण बिघडवलं म्हणणार.. आमचं असंच आहे. सौ सोनार की एक लोहार की..

''राज्यात शांतता राहिली तर उद्योगधंदे येतील, हे मान्य आहे. परंतु अशांतता कोण निर्माण करतोय, हे बघितलं पाहिजे. दलित समाज, नाभिक समाजावर मतदानावरुन अन्याय झाला आहे. राज्यात नेमकं चाललंय काय? राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?''

भुजबळ पुढे म्हणाले, जरांगेंच्या उपोषणादरम्यान महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला. हे मी दोन महिने बोलत आहे. परंतु कुणीही बोलायला तयार नाही. परंतु विधानसभेत गृहमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं आहे. जमाव हिंसक झाला आणि ७९ पोलिस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी बचावात्मक प्रतिकार केला आणि मग ५० आंदोलक जखमी झाले. ही बाजू उशिराने पुढे आली आहे. नाहीतर त्यांना तेवढी सहानुभूती मिळाली नसती.

भुजबळ म्हणाले, नांदेड जिल्ह्यातही तसाच हिंसाचार झाला. राज्यात अशांतता कोण पसरवत आहे? सध्या दादागिरी सुरु असून या दादागिरीला दादागिरीने उत्तर दिलं पाहिजे. स्वकियांवर हल्ला करा, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना शिकवलं का? असं म्हणत भुजबळ पुढे म्हणाले, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत का? याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. सगळे शांत बसले आहेत.. का? निवडणुकीसाठी? परंतु त्यांनी बोललं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT