Bhujbal  esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

''जातीनिहाय जनगणना केली तर ओबीसींची संख्या आणि त्यांची परिस्थिती यांचा अंदाज येण्यास मदत होईल. केंद्र सरकारकडून एससी, एसटीला जसे वेगवेगळे फंड मिळतात, तसे फंड ओबीसींनाही मिळू शकतील. त्यामुळे हा सर्व्हे भारत सरकारकडून व्हायला पाहिजे.''

संतोष कानडे

मुंबईः राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समता परिषद या संघटनेची बैठक संपन्न झाली आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालेला असताना भुजबळांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, बिहार सरकारने ज्याप्रमाणे जातीनिहाय जनगनणा केली आहे, तसा सर्व्हे महाराष्ट्रातदेखील व्हायला पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार असल्याचंही भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, जातीनिहाय जनगणना केली तर ओबीसींची संख्या आणि त्यांची परिस्थिती यांचा अंदाज येण्यास मदत होईल. केंद्र सरकारकडून एससी, एसटीला जसे वेगवेगळे फंड मिळतात, तसे फंड ओबीसींनाही मिळू शकतील. त्यामुळे हा सर्व्हे भारत सरकारकडून व्हायला पाहिजे.

ओबीसी आंदोलनाबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, मंगेश ससाणे, लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यात आणखी ओबीसींचं आंदोलनं सुरु आहेत. आंदोलकांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाहीये.

लक्ष्मण हाके यांना अतुल सावे, उदय सामंत, संदीपान भूमरे हे नेते भेटलेले आहेत. आमचंही त्यांच्याशी बोलणं सुरु आहे. त्यांनी सरकारकडून लेखी आश्वासन मागितलेलं आहे. यासंदर्भातला तोडगा लवकरच निघेल, असंही भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT