Chhatrapati Sambhaji Maharaj Sakal
महाराष्ट्र बातम्या

असा आहे शंभुमहाराजांच्या गौरवशाली राजमुद्रेचा अर्थ

इसवी सन १६८१ साली संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी आपली स्वतंत्र राजमुद्रा तयार केली.

दत्ता लवांडे

स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची १४ मे रोजी जयंती. नऊ वर्ष स्वराज्याचे छत्रपती म्हणून राहिलेल्या या राजाने आपल्या पराक्रमाने शत्रूला पाणी पाजले. पण स्वराज्यातीलंच काही फितुरांमुळे त्यांना शत्रूनं पकडलं होत. १६८० साली छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि संभाजी राजांवर स्वराज्याची धुरा आली. इसवी सन १६८१ साली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी आपली स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. पण या राजमुद्रेचा इतिहास आणि अर्थ आपल्याला माहितीये का?

१६ जानेवारी १६८१. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा राज्याभिषेक. संभाजी राजे छत्रपती जाहले. पण नवीन राज्य चालवायला नवी राजमुद्रा लागते म्हणून त्यांनी आपल्या नव्या राज्याची नवी राजमुद्रा तयार केली. संस्कृत भाषेत असलेल्या या राजमुद्रेचा इतिहास पिंपळाच्या पानासारखा असून त्यावर १६ बुरूजे आहेत. त्यावर संस्कृतमध्ये काही ओळी लिहिल्या आहेत.

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajmudra

श्रीशंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते |

यदं कसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी |

संभाजी महाराजांच्या राजमुद्रेवर वरील ओळी लिहिलेल्या असून "छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणूकाही स्वर्गीय तेजाने तळपत असून आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येत प्राणीमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल." असा छत्रपती संभाजी महाराजांच्या या राजमुद्रेचा मराठीतून अर्थ होतो.

त्यांच्या राज्यभिषेकानंतर त्यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाणे औरंगजेबाच्या एकाही सैनिकाला स्वराज्याच्या सीमेत प्रवेश करू दिला नव्हता. त्यांच्या पराक्रमाला सर्व शत्रू घाबरत असत. पण स्वराज्यातील काही लोकांनी फितुरू केली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती औरंगजेबाच्या तावडीत सापडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishtwar Cloudburst : ढगफुटीने भीषण दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती; पर्यटक अन् भाविकांची असते गर्दी

Indian Army : शत्रूचा कपटी डाव उधळला! जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक; शस्त्रांसह दारूगोळाही केला जप्त

Raj Thackeray : मांसविक्री, कत्तलखाने बंदीवरुन राज ठाकरे भडकले, म्हणाले- स्वातंत्र्यदिनीच लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय

ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन-सायलीचा रोमँटिक डान्स व्हायरल, दोघांचा डान्स एकदा पहाच!

Nashik Kumbh Mela : नाशिक महापालिका घेणार ४०० कोटींचे कर्ज; कुंभमेळ्यासाठी नवे नियोजन

SCROLL FOR NEXT