police news esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News : बनावट पोलिस असल्याचं समजून खऱ्या पोलिसांवर हल्ला; पोलिस भरती घोटाळ्याचं प्रकरण

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजी नगर येथील वैजापूरमध्ये काल मध्यरात्री पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पोलिस भरतीतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस गेले असता त्यांच्यावर हल्ला झाला.

पोलिस भरतीमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांवरुन सध्या चौकशी सुरु आहे. मुंबईतले दहीसर पोलिस काल छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. पोलिसांना दोन आरोपी वैजापूरमध्ये गेल्याचं कळलं. त्यानंतर पोलिस रात्री दीड ते दोन वाजता वैजापूरमध्ये गेले.

पोलिस वैजापूरमध्ये दाखल होताच त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी एकच आरडाओरड केली. त्यामुळे इतर गावकरी तिथे दाखल झाले. गावकऱ्यांनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. ३० ते ३५ जणांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला केली. उपस्थित गावकऱ्यांना पोलिस ठाण्यात फोन करुन बनावट पोलिस गावात आल्याचं सांगितलं.

गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यातून दोघांना सोडवलं. आज सकाळी खरा प्रकार समोर आलेला आहे. वैजापूरमध्ये गेलेले पोलिस मंबईतल्या दहीसर ठाण्याचे होते. पोलिस भरती घोटाळ्याचा तपास करण्यासाठी ते छत्रपती संभाजी नगरमध्ये दाखल झाले होते. याप्रकरणी आता १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT