Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi  Esakal
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : "...तर मविआच्या सभेला परवानगी नाही"; गिरीश महाजन यांचं मोठं विधान

वैष्णवी कारंजकर

महाविकास आघाडीकडून २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र रामनवमीच्या आदल्या दिवशी संभाजीनगरमध्ये झालेल्या हाणामारी आणि वाहन जाळपोळीच्या घटनेनंतर आता या सभेला परवानगी मिळेल की नाही, असा प्रश्न उद्भवला आहे.

यातच भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या एका विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या किराडपुरा शहरामध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री दोन गटात तुफान राडा झाला. यानंतर हाणामारी आणि वाहनांची जाळपोळही झाली. त्यामुळे आता सभेला परवानगी मिळणार की नाही, याबद्दल गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

२ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंग्यानंतर आता सभा होणार का? असा प्रश्न गिरीश महाजन यांना विचारला. मविआच्या सभेमुळे वातावरण बिघडत असेल, तर सभा थांबवू. पोलिसांनी काही रिपोर्ट दिल्यास किंवा सभेमुळे काही प्रश्न निर्माण होणार असतील तर प्रशासन परवानगी देणार नाही, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा घेतल्या जाणार आहे. त्यातली ही पहिलीच सभा असणार आहे. गिरीश महाजन यांच्या विधानानंतर आता महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे लक्ष लागलेलं आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT