Chhatrapati Sambhajinagar Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! 'छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही'; राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी | Chh. Sambhajinagar

दत्ता लवांडे

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांचे नामांतर केल्यानंतर आता मुंबई हायकोर्टामध्ये नामांतरासंदर्भात याचिकेवर सुनावणी झाली आहे. यावेळी कोर्टाच्या अंतिम सुनावणीवर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत अशी आशा कोर्टाने व्यक्त केल्यानंतर औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात नामांतराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील अंतिम सुनावणी अजून झाली नाही.

जोपर्यंत अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत जुनीच नावे वापरण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर महा अधिव्यक्तांनी बदलेली नावे न वापरण्याचं स्पष्ट केलं असलं तरी कर्मचारी बदलेली नावे वापरात असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

तर काही खात्यांनी नावांमध्ये बदल केलाय मात्र ते बदल प्रशासनिक आहेत असं महाअधिवक्यांनी कोर्टाला सांगितलं आहे. महाअधिवक्ता यांनी याआधी भाष्य करून देखील कर्मचारी नवीन नाव वापरत असतील तर ती प्रशासनावरची कमजोरी असून त्यांच्यावर अवमानाची कारवाई करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी येणाऱ्या बुधवारी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

होर्मुझनंतर मलक्का सामुद्रधुनीकडे वळले ट्रम्प, भारतापासून १५० किमी अंतरावर; अमेरिकेनं केला मोठा करार, चीनची कोंडी

Investment: SIP की PPF? 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांत कुठे मिळणार जास्त पैसा; जाणून घ्या सोप्या शब्दांत

'मला डिव्होर्सी मुलगाच हवा होता' लग्नासाठी अपूर्वा नेमळेकरचं होतं स्पष्ट मत, म्हणाली...'ज्याला त्या दुखाची जाणीवच...'

SCROLL FOR NEXT