Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj esakal
महाराष्ट्र

'8 एप्रिल 1627 हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी'; ज्येष्ठ इतिहास संशोधकाचं स्पष्ट मत

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरील स्वारीनंतर कोल्हापूरला आले होते. यावेळी ते अंबाबाईचे दर्शन घेऊन पन्हाळ्याकडे गेले. मध्यरात्री दिवट्यांच्या उजेडात त्यांनी पन्हाळगडाची पाहणी केली.

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) ८ एप्रिल १६२७ हीच खरी जन्मतिथी आहे. त्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत ते समजून घेण्याची आवश्यकता आहे,’ असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव (Senior History Researcher Dr. Ramesh Jadhav) यांनी येथे व्यक्त केले. महापालिकेतर्फे सुरू असलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ‘अपरिचित शिवछत्रपती’ या विषयावर ते बोलत होते.

डॉ. जाधव म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर विविध पातळ्यांवर चर्चा होते. यात इतिहास संशोधकांचे एक मत असते तर सामान्य लोकांच्या चर्चेत दुसरे मत असते. अशी मतभिन्नता अनेक पातळीवर चर्चेत आली, यापैकी भोसले कुळी ही राजपूत घराण्याशी संबंधित असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरू झाल्या, मात्र विविध इतिहास संशोधकांनी केलेल्या संशोधनानंतर भोसले घराण्याचा व राजपूत घराण्याशी कोणताही संबंध नसल्याचे उघड झाले.

इतिहासकाळात महाराष्ट्रात क्षत्रिय व ब्राह्मण हेच वर्ग होते. यातील मराठा हे क्षत्रिय असल्याचे वि. का. राजवाडे यांनी पुराव्यानिशी सांगितले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नी होत्या. त्या सर्वजणी महाराष्‍ट्रातील विविध घराण्यांतील होत्या. त्यामुळे भोसले कुळीचा राजपूत घराण्याशी जोडलेला संबध निराधार ठरतो.’

डॉ. जाधव पुढे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३० अशीच मांडली गेली. यात जुन्या तिथीमध्ये नवी तिथी घुसडली गेली. साल व तारीख बदलेली गेली. त्यावर मत-मतांतरे व्यक्त होऊ लागली. १९९५ ला हा वाद सुरू झाला. यात शासनाने समिती नियुक्ती केली. त्यानुसार शासनाने दिलेली एक तारीख व काही मोजक्या संशोधकांनी सांगितलेली ती दुसरी तारीख. अशा दोन तारखा चर्चेत आल्या, मात्र यात ८ एप्रिल १६२७ हीच खरी जन्मतिथी आहे. त्याचे पुरावे आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी लिहिलेले एक पत्र संदर्भासाठी इतिहास संशोधकांकडे आहे.’

शिवछत्रपतींनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरील स्वारीनंतर कोल्हापूरला आले होते. यावेळी ते अंबाबाईचे दर्शन घेऊन पन्हाळ्याकडे गेले. मध्यरात्री दिवट्यांच्या उजेडात त्यांनी पन्हाळगडाची पाहणी केली. त्यानंतर ते गोव्याच्या स्वारीवर गेले, असे पुरावेही इतिहासकारांकडे असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

आजचे व्याख्यान

  • वक्ते : माजी सनदी अधिकारी महेश झगडे

  • विषय : लोकशाही - प्रशासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT