Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Prasad Lad: शिवरायांची भवानी तलवारच भाजपचं मुंडक छाटणार; शिवसेना संतापली

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आणि आता यांच्यानंतर भाजपचे प्रसाद लाड. लाड यांनी शिवाजी महाराज यांच्याबाबत अजब विधान केलं आहे. त्यामुळे राज्यात वादात आणखी भर पडली आहे. अनेक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. अशातच, शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Controversial Prasad Lad Sanjay Raut)

लाड यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अरे कोण प्रसाद लाड ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का? भाजपा मधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक नवीन भाष्य करतो. हे काय दत्तो वामन पोतदार किंवा सेतुमाधवराव पगडी किंवा इतिहासकार जे यदुनाथ सरकार हे आहेत का? या भाजपाचं डोकं फिरलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे, ती शक्तीच यांना संपवेल. शिवाजी महाराजांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार आहे. रोज कोणीतरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो.' असे राऊत म्हणाले आहेत.

तसेच, 'मला असं वाटायला लागलं आहे, की यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी एक मंत्र देतो आणि मग हे अशाप्रकारे बोलतात. शिवाजी महाराजांवर अशाप्रकारे बोलण्याची यांची लायकी आहे का?, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला?, त्यांच महानिर्वान कुठे झालं? याबाबत अख्ख्या जगाला, देशाला माहिती आहे. रायगडावर त्यांची समाधी आहे.' त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. आता तुम्ही नवीन शोध लावताय असही राऊत यावेळी म्हणाले.

काय म्हणाले प्रसाद लाड?

कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. आमदाराच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT