Chhatrapati Shivaji Maharaj Controversial statement of Prasad Lad  esakal
महाराष्ट्र बातम्या

Prasad Lad: भाजपच्या अडचणीत वाढ? शिवरायांचा जन्म कोकणात; प्रसाद लाडांचे वादग्रस्त वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

एकिकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या विधानांमुळे चर्चेत आहे. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच, आणखी एका नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मासदंर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Controversial statement of Prasad Lad )

आधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. आमदाराच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लाड यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन करता आमदार प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या बाजुलाच भाजप नेते प्रवीण दरेकर बसले होते. तेदेखील प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर काहीच बोलले नाहीत.

प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केल्यानंतर समोर बसलेल्या काहींनी कुजबूज करत शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला, असे लाड यांना सांगून पाहीले. मात्र, त्यानंतरही लाड यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला नाही की त्याची दुरुस्ती केली नाही.

पण सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शिवरायांचे बालपण कोकणात गेले. रायगडावर गेले. येथे त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, असे वक्तव्य वादाग्रस्त विधानानंतर लाड यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

Dalit CM : सिद्धरामय्यांचा उत्तराधिकारी कोण? कर्नाटकात दलित मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा पुन्हा तापली, 'या' चार नेत्यांची नावे अग्रभागी

Nashik Women's Cricket World Cup Winner: झुंजार बहिणींचा विजय! महिला विश्वकरंडक जिंकताच नाशिकमध्ये मध्यरात्री 'दिवाळी', तिरंगा फडकावत जल्लोष

Nanded Crime : 21 वर्षीय तरुणीवर घरात घुसून अत्याचार; तोंडात विषारी द्रव पाजून तिला ठार मारण्याचाही केला प्रयत्न

Latest Marathi News Live Update : फलटनमध्ये पोलिस ठाण्यासमोर सुष्मा अंधारेचा ठिय्या

SCROLL FOR NEXT