Chhatrapati Shivaji Maharaj Period Katyayan Zambia weapon esakal
महाराष्ट्र बातम्या

Katyayan Weapon : हस्तिदंत, नेपाळी दगड, सोने-चांदी, हिरे, माणिक, मोत्यांनी बनलेलं शस्त्र म्हणजे 'कात्यायन'

जांबिया किंवा कात्यायन कमरेस बांधण्याची एक कला आहे.

सकाळ डिजिटल टीम

फेट्यासारख्या लांब पट्ट्यात किंवा सांबराच्या चामड्याच्या पट्ट्यात जांबिया बांधला गेला की, कंबर नेहमी ताठ राहते.

-संदीप ऊर्फ नाना सावंत

वाघाच्या दातासारखी रचना असलेले, मध्ये शिर असलेले, दोन्ही बाजूस तीक्ष्ण धार असलेले, साधारण नऊ ते दहा इंच लांब, हस्तिदंत, शिंग, जेड (नेपाळमध्ये मिळणारा दगड) कचकड्या, शिसम लाकूड याची मूठ असलेले, मुठीच्या पृष्ठभागावर चांदी, सोने, रूपे यांची फुले, सोन्याच्या पट्ट्या, तार, हिरे, माणिक, मोती वगैरेची रत्ने बसवून शोभा वाढविलेले शस्त्र म्हणजे ‘कात्यायन’ (जांबिया, बांक) होय.

याचे मूळ अरबस्थान, इराण येथे असले तरी, भारतात दिल्ली, जोधपूर येथे उच्च प्रतीचे जांबिया बनविले जात असत. चंद्रवटी पोलादापासून बनविलेला कणीदार सकेला हे त्याचे रूप होते. सिरोही येथे चंपानेर घाट असलेले बांक बनवित असत.

जांबिया किंवा कात्यायन कमरेस बांधण्याची एक कला आहे. त्याच्या गाठी निरनिराळ्या प्रकारच्या दिल्या जातात. फेट्यासारख्या लांब पट्ट्यात किंवा सांबराच्या चामड्याच्या पट्ट्यात जांबिया बांधला गेला की, कंबर नेहमी ताठ राहते. सांबराच्या चामड्याच्या पट्ट्यात जांबिया ठेवण्यासाठी एक घर केले जात असे. या घरास ‘एक्का’ असे संबोधतात.

आडोळशाच्या लाकडापासून जांबियाचे म्यान तयार केले जात असे. हे म्यान फार नामी समजले जात असे. या म्यानावर जरदोषी, मखमली कपडा लावून सोने, चांदी, रूपे यांचे गोफ लावले जात असत. त्यावर मगदुरीप्रमाणे मोंढळा, नक्क्या व कबजे बसविली जात असत. म्यानातून जांबिया एकदम पडून जाऊ नये म्हणून रेशमी अगर जरीचा गोफ कडीस लावला जात असे. त्यास ‘गलतनी’ असे म्हणत.

जांबियाचे विविध प्रकारचे हात, हाताचे फेकन, रोक व बंदेश आहेत. त्यामध्ये कमानबंद (कमरबंद) व हातकडी अशी बंदेशची दोन नावे पाहण्यास मिळतात. ‘शेरधज’ साडेतीन पावलाचा, ‘अलीमदद’, तीन पावलाचा ‘हनुमंती’ पवित्र्यात जांबियाच्या चाली कराव्या लागतात. मोकुफ, कोनी-बंध (शिर वार मारणे), कोनीजोर, डुबकस (जफरबंद), नाकपट्टी (नकसुरी शहाजोर), उजवे कानशील, कलाजन-शहाजोर (रुस्तमबंद), तमाचा अशाप्रकारे जांबिया लढतीत वार मारण्याची प्रथा आहे.

निरनिराळ्या जनावरांनी सृष्टीत एकमेकांना मारण्यासाठी काय केले, याचा व्यासंग वसिष्ठांनी करून या कामासाठी चाळीस पेच निर्माण केले. हे पेच वापरून माणूस हत्तीचा पाय मोडू शकतो, वाघास फाडू शकतो, हरणास पकडू शकतो, मोठे वजन सहज उचलू शकतो, शरीराचे निरनिराळे भाग धरून मागे-पुढे ओढून सांधे किंवा नाजूक भाग याचा घात करू शकतो. शत्रूस अधू करू शकतो. यास बाहुयुद्ध किंवा तंत्रयुद्ध असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

"आणि मी कारमधील गणपतीची ओरबाडून काढून फेकली" जुई गडकरीने सांगितला तो प्रसंग; "मी हॉस्पिटलमध्ये.."

SCROLL FOR NEXT