Chhattisgarh Border sakal
महाराष्ट्र बातम्या

Chhattisgarh Border : बारा नक्षलवादी चकमकीत ठार;महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कारवाई

नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना सुरक्षा जवानांनी आज चकमकीमध्ये बारा नक्षलवादी ठार झाले.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना सुरक्षा जवानांनी आज चकमकीमध्ये बारा नक्षलवादी ठार झाले. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगलात आज दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या या चकमकीत एक उपनिरीक्षक जखमी झाले. जवानांच्या सी-६० पथकाच्या या यशाबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात सी-६० पथकाचे जवान आणि पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी इंटला गावाजवळील जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. सुरक्षा जवानांनी तातडीने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. यावेळी जोरदार चकमक होऊन बारा नक्षलवादी मारले गेल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

मारल्या गेलेल्या बारा नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. टिपागड (ता. कोरची) दलमच्या विभागीय समितीचे सदस्य लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम यांचा समावेश आहे. बाकीच्या दहा नक्षलवाद्यांची ओळख पटली नसून ती पटविण्याचे काम सुरु आहे.

सहा तास सुरु होते थरारनाट्य

जवान व नक्षलवाद्यांमध्ये दुपारी सुरू झालेली चकमक रात्री आठवाजेपर्यंत, म्हणजे सुमारे सहा तास सुरू होती. या थरारनाट्यानंतर परिसरात शोधमोहिम घेतली असता बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. जवानांनी घटनास्थळावरून तीन एके-४७ रायफली, दोन बंदुका, एक कार्बाईन, एक एसएलआर, सात स्वयंचलित शस्त्रे हस्तगत केली.

५१ लाखांचे बक्षीस

नक्षलविरोधी कारवाईदरम्यान मागील काही वर्षांत झालेली ही सर्वांत मोठी चकमक असून गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी सी- ६० जवानांना ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT