eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १ हजार ८५१ कोटी रुपयांची मदत; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी १ हजार ८५१ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी १ हजार ८५१ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली. मागील दीड वर्षांत शेतकऱ्यांना विविध विभाग व योजनांच्या माध्यमातून ४४ हजार कोटी रुपयांची मदत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. दुसरीकडे सरकारने केवळ आकड्यांचा खेळ केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

राज्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने नऊ लाख ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांनी आंदोलन केले. सभागृहात देखील या विषयावर चर्चा घडवून आणण्यात आली होती. त्यामुळे सरकार या ९ लाख ७५ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीसाठी मोठे पॅकेज जाहीर करेल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात या नुकसान भरपाईपोटी १ हजार ८५१ कोटी रुपये वितरित करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला विरोधकांनी आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची मागणी फेटाळल्याने सभात्यागही केला.

घोषणेची अपेक्षा हवेतच विरली

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भाषणात दीड वर्षांत केलेल्या मदतीचा ऊहापोह केला. अवकाळीने धान, कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. ज्यांना विमा रक्कम मिळाली ती अगदीच तुटपुंजी आहे. याबाबत सभागृहात विरोधी सदस्यांनी वारंवार चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आज काय घोषणा करणार? याकडे सभागृहाचे लक्ष लागले होते. मात्र या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी केवळ दीड वर्षांत केलेल्या ४४ हजार कोटी रुपयांच्या मदतीची माहिती दिली.

कर्जमाफीचे सूतोवाच

सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, धानासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत १५ हजारांऐवजी २० हजार रुपये मदतीची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT