महाराष्ट्र बातम्या

CM Shinde: मी बोलत नाही तरी तुम्ही का एवढं बोलता? मुख्यमंत्र्यांनी मंत्री आणि आमदारांना झापलं

एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर नाराजी व्यक्त केली आहे

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटातील वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करणारे मंत्री आणि आमदार हे आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यासाठी डोकेदुखी बनलेत. मंत्री तानाजी सावंत यांनी आरक्षणाबाबत केलेल्या मोठ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान शिंदे गटातील अनेक आमदार विरोधी पक्षांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्ये करताना दिसतात. याच बेजबाबदार बोलण्याला आवर घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी आमदार आणि मंत्र्यांना दम भरला आहे.

शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर नाराजी व्यक्त केली आहे. मी बोलत नाही तरी तुम्ही का एवढं बोलता? असा प्रश्नही मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी बेजबाबदारपणे बोलणाऱ्या मंत्र्यांना आणि आमदारांना विचारला आहे. वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या आमदारांचे आणि मंत्र्यांचे कान मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत टोचले आहेत.

पक्षाच्या चिन्हाबाबत विनाकारण बोलू नका. त्याचबरोबर वादग्रस्त वक्तव्य करु नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना दिल्या आहेत. शिंदे गटाचे मंत्री हे सातत्याने विरोधकांवरती विशेषत: शिवसेनेवर जास्त प्रमाणात टीका करत असतात. राजकारणाच्या सद्य परिस्थितीत त्यांनी केलेली वक्तव्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिंदे गटातील मंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळ बैठकीतच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना झापले होते. अब्दुल सत्तार यांनी राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस चांगलेच संतापले होते. मंत्रीमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना खडसावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT