CM Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde: शिंदे गट पुन्हा गुवाहटीला जाणार? नेमकं शिजतंय काय?

संतोष कानडे

मुंबईः राज्याच्या सत्तांतराचा नाट्यमय खेळ ज्या गुवाहटीमध्ये झाला. त्याच गुवाहटीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. तिथे ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहे. त्यांच्यासोबत शिंदे गटातील सर्व आमदार असणार आहेत. सूत्रांच्या वतीने ही माहिती देण्यात आलेली आहे.

पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटातील सर्व आमदारांचा दौरा निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी काही पदाधिकारी गुवाहटीला गेल्याची माहिती आहे.

गुवाहटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाख्या देवीची विशेष पूजा करतील. यासह आसामचे राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलिस कमिश्नर आणि ज्यांनी-ज्यांनी सत्तासंघर्षावेळी मदत केली त्यांची भेट घेतील. पुढच्या आठवड्यामध्ये हा दौरा निश्चित केल्याचं सांगण्यात येतंय.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीचं सूतोवाच केल्यानंतर शिंदे गटाच्या या दौऱ्याकडे विशेष अर्थान बघितलं जातंय. आमदारांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी तर हा दौरा नाही ना? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT