CM Eknath Shinde News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असतांना शिंदेंचा पुन्हा दौरा; यावेळी अयोध्येला जाणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथं ते शरयू नदीकाठी आरतीदेखील करतील. राज्यात एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असतांना एकनाथ शिंदे मात्र आमदारांचे दौऱ्यावर दौरे काढत आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे शिंदे गटातील अनेकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नाहीये. मागे अशीच नाराजी पुढे आल्याने शिंदेंचा गुवाहटी दौरा झाला. आता पुन्हा ते अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

हेही वाचाः हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेचे ४० आमदार, इतर आमदार, १३ खासदार अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी अयोध्येतील शशिकांत महाराज दास, शत्रुघ्न दास महारज आणि छबीराम दास यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांना अयोध्या दौऱ्याचं निमंत्रण दिलं होतं.

सध्या राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन आटोपल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदेंचा लवाजम्यासह दौरा होईल, अशी सूत्रांची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

गुवाहाट दौऱ्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह मिळालं. सध्या अधिकृतरित्या शिंदेकडे खरी शिवसेना आहे. मात्र ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलंय. त्यासंदर्भातील सुनावण्या सुरु आहेत. आज सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी झाली. उद्या सुनावणीचा शेवटचा दिवस असून न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT