Chief Minister Fadnavis will not allow money to be paid to Saklai; all descendants of Chhatrapati are in BJP 
महाराष्ट्र बातम्या

"साकळाई'ला पैसे कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री फडणवीस; छत्रपतींचे सगळे वंशज भाजपमध्ये

संजय आ. काटे

श्रीगोंदे (नगर) - श्रीगोंदे आणि नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना साकळाई योजनेबाबत दिलेला शब्द खरा करणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी जलसंपदा खाते सक्षम आहे, असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे आल्याने छत्रपतींचे सगळेच वंशज भाजपमध्ये आल्याचे सांगितले.

महाजनादेश यात्रेनिमित्त काष्टी येथे झालेल्या सभेत म्हणाले, की महाराष्ट्र स्वतंत्र दिसतोय त्याचे कारण छत्रपती शिवाजीराजांनी मोगलाई गाडली. आज त्याच छत्रपतींचे वंशज छत्रपती उदयनराजे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. छत्रपती संभाजीराजे अगोदर भाजपमध्ये आलेत. आता उदयनराजे आल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व घराणे देशाच्या विकासासाठी भाजपमध्ये आले.


व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते.

समुद्राला जाणारे पाणी गोदावरीत
आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलो. हजार कोटी शेतकऱ्यांना दिले. सिंचनाचे प्रकल्प सुरू केले. डिंभे ते माणिकडोह बोगद्याला प्रशासकीय मान्यता दिली. "साकळाई'सुद्धा होईल. सर्व्हे पूर्ण झाल्यावर निधी दिला जाईल. त्यासाठी पैसे कमी पडणार नाहीत. पुढचे पाच वर्षांत वाहून जाणारे पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यात आणून ते मराठवाडा आणि नगर जिल्ह्यात दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT