eknath shinde  sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्री दोन दिवस आराम करण्यासाठी शेतात गेलेत, तिथही ते काम करतात; दादा भुसे यांचे विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. मात्र शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री आराम कऱण्यासाठी त्यांच्या शेतात गेले असल्याचं म्हटलं.

एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री नाराज नाहीत. ते 24 तासापैकी 18 ते 20 तास काम करतात. किमान 5 ते 6 तास शरीराला झोपेची गरज असते. त्यामुळे आम्हीच खासगीत त्यांना आराम करण्यासाठी सांगत असतो. सकाळी 4 ते 5 पर्यंत ते काम करत असतात. आता 2 दिवस ते आराम करण्यासाठी त्यांच्या शेतात गेले आहेत. मात्र तिथून देखील ते काम करत होते, असंही दादा भुसे यांनी म्हटलं.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण कुटुंबाला पंतप्रधान भेटले आहे. खुद्द मोदींनी त्यांना शाबासकीची थाप दिली. अमित शहा यांच्या घरी देखील मुख्यमंत्र्यांचे स्वागत झाले आहे. मात्र सध्या राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी विरोधकांनी टीका करताना मर्यादा सोडू नये, नाही तर आम्ही देखील सोडू असं म्हणत दादा भुसे आक्रमक झाले आहेत.

मी नाराज नाही, आज देखील सकाळी मी बैठक घेतली आहे. ध्वजारोहण संदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतात. उद्या मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी काश्मीर ला जाऊन देखील ध्वजारोहण करेन, असंही दादा भुसे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT