vijay waddetiwar 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : OBC तरुणांचं उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जावं; विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

रवींद्र देशमुख

मुंबई - जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीचं उपोषण आजअखेर थांबवण्यात राज्य सरकारला यश आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जावून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आपल्या हस्ते सोडवलं. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, उशीर केला पण उपोषण सुटलं याचा आनंद आहे, देर आये दुरुस्त आहे. मात्र आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. आरक्षणावरून संभ्रम निर्माण झाला आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, याबाबत समाजाला आश्वस्थ करण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं.

दरम्यान जिथं ओबीसी तरुण उपोषणाला बसले आहेत, तिथंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जावं आणि उपोषण सोडवावं. जागोजागी जावून उपोषण सोडवणं आणि आंदोलन थांबवणं हेच काम सरकरच राहिलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात काय चर्चा झाली हे माहित नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाज विरोध करत नाही. मात्र मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले की, आता दीड वर्ष झालं आहे. निवडणुकीला आता काही ८ महिनेच शिल्लक आहे. त्याआधी देतात की, पुन्हा पाने पुसतात, हे पाहावं लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT