Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल; शुक्रवारी होणार शस्त्रक्रिया?

कोविड काळात मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मानेच्या दुखणं बळावल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान ही माहिती दिली.

मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. मान आणि पाठीच्या दुखण्यानं त्रस्त असल्यानं या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित झाले होते. ज्यावेळी या बैठकीत ते सामिल झाले तेव्हाच त्यांनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, मी थोड्याच वेळात बैठक संपल्यानंतर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणार आहे. तसेच तपासणीनंतर शस्त्रक्रियेची गरज पडल्यास शस्त्रक्रियाही करुन घेणार आहे.

गेल्यावेळेस गिरगावातील एचएन रुग्णालयात मुख्यमंत्री उपचारांसाठी गेले होते. तेव्हा तिथले उपचार त्यांच्यावर अद्यापही सुरु आहेत. पाठीला लेप लावण्यापासून मानेला पट्टा लावण्यापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचाही सल्ला दिला आहे. आज जर मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाले आहेत तर त्यांच्यावर गेल्या चोवीस तासात तपासण्या होतील त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते.

मुख्यमंत्री बैठकीत सांगितलं की, "गेल्या दोन वर्षांपासून राज्य कोविडचा मुकाबला करत असताना जीवनचक्र सुरु रहावं यासाठी आपण सर्वच जण अविरत काम करत होतो. याकाळात माझं मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झालं. यामुळं याचा जो परिणाम व्हायचा तो झालाचं"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT