Hotel Sakal
महाराष्ट्र बातम्या

हॉटेल्स, दुकानं खुली ठेवण्याची वेळ वाढवणार? आज महत्त्वाची बैठक

कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतलेल्यांना सवलती मिळणार?

रश्मी पुराणिक

मुंबई: मुंबईसह (Mumbai) राज्यात आता बऱ्यापैकी कोरोनाची साथ (corona virus) नियंत्रणात आली आहे. रुग्णांची संख्या कमी होत असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. काल मुंबईत पहिल्यांदाच कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोना व्हायरसची साथ सुरु झाल्यानंतर हे पहिल्यांदाच असं घडलं आहे. हे एक चांगलं लक्षण आहे. मुंबईत कोरोना बाधित होण्याचा दर 1.27% वर आला असून, रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्क्यांवर आला आहे. मुंबईसाठी ही एक चांगली बातमी आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोविड टास्क फोर्स सोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. निर्बंध शिथील होण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. दिवाळीआधी आणखी काही निर्बंध शिथील होऊ शकतात. राज्यात आता शाळा, सार्वजनिक वाहतुकीसह बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या आहेत. पण वेळेच्या बाबतीत अजूनही काही मर्याद आहेत. हॉटेल, दुकानांना वेळेची मर्यादा पाळावी लागत आहे.

दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्यामुळे हॉटेल, दुकानं खुली ठेवण्याची वेळ वाढवणार? तसंच कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतलेल्यांना सवलती मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सध्या दुकानांना रात्री नऊ आणि हॉटेल्सना रात्री १० वाजेपर्यंत परवानगी आहे. दिवाळीमध्ये अर्थकारणाला मोठी चालना मिळते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लॉकडाउनमुळे दुकानदार, व्यावसायिकांचे नुकसान झालं आहे. हॉटेल्स, दुकानांना वेळ वाढवून दिल्यास हे नुकसान काही प्रमाणात भरुन येऊ शकते. त्यामुळे आजच्या बैठकीत निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय होणार? याकडे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT