Milind Narvekar
Milind Narvekar 
महाराष्ट्र

CM ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टवर

चंद्रशेखर जोशी

मुंबई: देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरूपती देवस्थान (tirupati devsthan) ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्र प्रदेश सरकारने (andhra pradesh govt) जाहीर केलीय. या यादीत देशभरातून २४ व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलंय. देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित असे आंध्र प्रदेशातील तिरूमला येथील तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक अशी सुद्धा मिलिंद नार्वेकर यांची ओळख आहे.

या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधून ही नियुक्ती सूचवत असतात. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधुन महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर केलीय.

त्याप्रमाणे काल आंध्र प्रदेश सरकारने अधिकृत अधिसूचना काढत, नवी तिरूमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केलीय. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गवर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झालीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : चांगल्या सुरुवातीनंतर राहुल त्रिपाठी बाद, पण अभिषेक शर्मानं झळकावलं अर्धशतक; हैदराबादच्या 100 धावा पार

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT