Udhav Thakare Udhav Thakare
महाराष्ट्र बातम्या

BKC मैदानावर उद्धव ठाकरेंची फटकेबाजी; वाचा काय म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुन्नाभाई चित्रपटाचं उदाहरण देत राज ठाकरेंवर हल्लाबोल

मुन्नाभाईमध्ये जसे संजय दत्तला गांधी दिसतात तसे आपल्याकडे आहेत एक असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. हे कधी शाल घेऊन फिरतात, तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. मात्र, मुन्नाभाई चित्रपटातील मुन्नाभाई लोकांचं भलं करत होता याचं काय? शेवटी संजय दत्तला कळत आपल्या डोक्यात केमिकल लोचा आहे, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, असे अनेक मुन्नाभाई फिरत असून त्यांना फिरुद्यात असं म्हणत राज ठाकरेंवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

सोमय्यांना सॉसची बाटली कुणी दिली 

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून देत सोमय्यांना सॉसची बाटली कुणी दिली? सॉसचा फोटो आल्यावर दिल्लीतून पत्र आलं, आम्हाला काय विचारता, सुरक्षा तुम्ही दिली ना...विचारा सॉसची बाटली कोणी दिली.

उद्या हे दाऊदसोबतही दिसतील

दाऊद बोलला मी भाजपात येतो तर हे मंत्री म्हणून त्याच्यासोबत दिसतील. मला वाटत त्याच्याच मागे लागले असतील आमच्यात ये तुला मंत्री बनवतो आणि उद्या म्हणतील दाऊद म्हणजे सद्गुणांचा पुतळा. बाबरी पडल्यावर तुम्ही शेपटी आत घालून बसला आणि तुमची हातभार नाही मैलभर.......पळापळ झाली, पटकन बोललो नाही तर गैरसमज होईल. तुम्ही वाजवलेल्या त्या थाळ्या आजही रिकाम्या असे म्हणत आम्ही भरलेली थाळी देतो, रिकामी नाही. आता ही करा गो महागाई गो, गो बेकारी गो असं म्हणत त्यांनी रामदास आठवलेंच्या गो कोरोना गो ला टोला लगावला. हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व असल्याचे ते म्हणाले.

संघाची टोपी काळी का? 

बाबरी पडली, बाळासाहेब म्हटले चांगलाय की...शिवसैनिकांनी पडली असेल तर मला अभिमान कारसेवा म्हणजे अयोध्येला जाऊन गाड्या धुवायच्या का? तेव्हा पुन्हा येईन पुन्हा येईन भोंगा वाजवला का नाही असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. या सर्व मुद्द्यावर बोलण्याऐवजी महागाईने होरपळलेल्या जनतेला उत्तर द्या. गेल्या वेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या, हिंदुत्व डोक्यात, टोपीत नाही...भगवी टोपी घालून हिंदुत्व दाखवत असाल तर RSS ची टोपी काळी का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

हे काश्मीर फाईल्सचं पुढचं पान आहे का?

दोन दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये काश्मीर पंडित राहुल भट यांची हत्या झाली, त्या कार्यालयासमोर हनुमान चालीसा पठन करायची की घंटा वाजवायचा? असा सवाल उपस्थित करत, आमचा बळीचा बकरा केला जातोय अशी भावना कश्मीर पंडित व्यक्त करत आहे. या घटना काश्मीर फाईल्सचे पुढचे पान आहे का? असा सवाल त्यांनी भाजपला विचारला.

आमच हिंदुत्व खरं की खोटं तुम्ही कोण ठरवणार असे म्हणत काँग्रेससोबत गेलो करण तुम्ही ढकललं पण हिंदुत्व सोडलं नाही. ते काय धोतर आहे का...कधी नेसली कधी सोडलं. तुमच्यासारखा सकाळचा शपथविधी केला नाही. तुमचा प्रयत्न यशस्वी झाले असते तर, अनिल देशमुख, नवाब मलिक तुमच्या मांडीला मांडीला लावून गुणगाण गात बसले असते का? बोगस हिंदुत्ववाद्यांनी मेहबूबा मुफ्तींसोबत सरकार केलं, ते भारत माता की जय बोलतात का? पाकिस्तानने आव्हान दिल म्हणून सरकार स्थापन करून दाखवल, कोणासोबत मुफ्ती महोमद सोबत...असा टोला देखील ठाकरेंनी लगावला. यावेळी बाबरी मशिद पाडण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर बोलताना तुम्ही बाबरीवर चढायचा प्रयत्न केला असता तर बाबरी खाली अली असती, एक पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती असा खोचक टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सामनात जे येत ते देश आणि राज्याच्या हिताचं ते येणारच. लांडग्यांच्या पिलावळी जो अपमान करतायत त्या भाषेत एकतरी लेख आहे का? पेट्रोल दर वाढले 7 पैशांनी म्हणून वाजपेयी बैल गाडीतून संसदेत गेले, तो संवेदनशील भाजप कुठे गेला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेना बाळासाहेबांची राहिली नसेल तर, भाजप तरी वाजपेयींचं राहिलंय आहे का? असा प्रश्न

मुंबईवर संकट आले की, आधी धावून जाणार शिवसेना, शिवसैनिक

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मागवलीये का, तुम्ही आम्ही मागितली का? शिवसेना स्वतंत्र लढ्यात नव्हती पण माझे आजोबा, वडील आणि काका होते. महाराष्ट्र स्वतंत्र लढयात सगळ्यात आधी जनसंघ (RSS) फुटली. मुंबई फोडण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत. महागाई - हिंदुत्व श्वास, मराठी प्राण महागाईबद्दल कोणीच बोलत नाही असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबो केला. कोविड सभेत मोदींनी इलाज सांगितला. मुंबईवर संकट आले की, आधी धावून जाणार शिवसेना, शिवसैनिक

मुंबईचे लचके तोडणाऱ्यांना सोडणार नाही

मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न केले तर, तुकडे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. 1 मे जेव्हा साजरा करत होतो, तेव्हा भाजपाची सभा होती. तेव्हा सभेत फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होते ते ओठात आले. आम्ही मुंबई स्वतंत्र करणार असे ते म्हणाले होते. यावर हल्लाबोल करत मुंबई मराठ माणसाने रक्त सांडून मिळवलेली आहे. त्यामुळे मुंबईचे लचके तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू.

आम्ही गध्याला सोडून दिले म्हणत ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

जी गाढवे आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. आमचे हिंदुत्व गदाधारी होते, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडले. आम्ही गध्याला सोडून दिले. कारण काही उपयोग नाही त्याचा असे म्हणत त्यांनी भाजपवर घणाघात केला.

आपलं हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचं घंटाधारी आहे

हल्ली खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, ते देशाची दिशा भरकटवत आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आपले हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचे घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा. काय मिळालं, घंटा. असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

हिंदुत्व धोक्यात कुणामुळे आले आहे हे तपासायची गरज निर्माण झाली असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, काश्मीरमध्ये पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजतेय हे सर्वांनी लक्षात घ्यावे. शिवसेनेवर बोटे दाखवू नका, शाहिस्तेखानाप्रमाणे तुमचीही बोटं छाटली जातील एवढी ताकद शिवसेनेत आहे – संजय राऊत

संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीपुढे ओवैसींनी फुलं वाहण्यावरून राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ओवैसी औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतो हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. काँग्रेसच्या काळात, फडणवीसांच्या काळात आत्तापर्यंत किमान 20 वेळा ओवैसी औरंगजेबाच्या कबरीपुढे गेला, तेव्हा हा महाराष्ट्राचा अपमान वाटला नाही का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. 2014 पासून ओवैसी महाराष्ट्रात येत असल्याचे ते म्हणाले.

तर लडाखमध्ये घुसलेलं चीनचं सैन्य पळून जाईल - संजय राऊत

यावेळी संजय राऊत यांनी हनुमान चालिसा पठनाचा मुद्दा घेत म्हणाले की, इथल्या सगळ्या लोकांनी हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केली, तर लडाखमध्ये घुसलेलं चीनचं सैन्य पळून गेल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या जनसागरात आहे.

मुख्यमंत्री मोठा दारूगोळा घेऊन येत आहेत : संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत मंचावर येताच म्हणाले की, आपल्या तोफा नेहमीच धडाडत असतात असे म्हणत ते म्हणाले की, न झुके है ना झुकेंगे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खूप मोठा दारूगोळा घेऊन मंचावर येणार असून, खऱ्या तोफा काय आहेत हे महाराष्ट्राला आज कळेल.

तुम्ही कोणतं सरकार निवडणार ? घर पेटवणारं की चूल पेटवणारं? आदित्य ठाकरेंचा प्रश्न

देशात जिथे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, महागाई, बेरोजगारी, जातीय तेढ असे प्रश्न आहेत, अशा वेळी तुम्ही कोणते सरकार निवडणार ? घर पेटवणारं की चूल पेटवणारं? असा प्रश्न पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना विचारला.

महाविकास आघाडीच्या सरकारला अडीच वर्ष होत आली आहेत. पण सतत देशातल्या टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्याचे सांगत महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हे कौतुकास्पद आहे.

जय महाराष्ट्र म्हणत आदित्य ठाकरेंची भाषणाल सुरुवात

माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. येताना मी गर्दी बघत होतो. इथे पहिली रांग वांद्र्यात असेल, तर मागची रांग कुर्ल्यात पोहोचली आहे एवढी तुफान गर्दी आहे. या सर्व शिवसैनिकांमध्ये मला माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि आजी दिसली. यावेळी त्यांनी कोविड काळत मुख्यमंत्री प्रत्येक विभागात गेले असे म्हणत कोविड काळात केलेल्या कामाचे कौतुक जगाकडून करण्यात आले. 15 दिवसात कोविड सेंटर उभे केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल

बीकेसीच्या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल झाले असून, थोड्याचवेळात ते सभेला संबोधित करणार आहेत. यावेळी ते नेमकं कोण-कोणत्या मुद्यांवरून विरोधक आणि राज ठाकरेंवर हल्लाबोल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गर्वसे कहो हिंदू है; बाळासाहेबांचा नारा

यावेळी मंचावरून बोलताना शिवेसेनेचे नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, संघर्षानंतर मुंबई मराठी माणसाची झाली असे म्हणत, शिंदे म्हणाले की, बाळासाहेब दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते. परंतु, अयोध्येतेली मशिद पाडल्यानंतर दाऊदने मुंबईत अनेक स्फोट घडवून आणले. त्यानंतर पेटलेली मुंबई बाळासाहेबांनी शांत केली. शिवसेना कधी कुणाला घाबरला नाही आणि घाबरणार नाही असे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो : गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील म्हणाले की, अडीच वर्षांच्या कार्यकाळात चांगलं काम झालं आहे. यावेळी ते म्हणाले की, तुमचा पणजोबा खापर पणजोबा आले तरी शिवसेना संपू शकत नाही. शिवसेनेच्या जिवावर अनेकजण मोठे झाले आहेत. देशात उद्धव ठाकरे सर्वोकृष्ठ मुख्यमंत्री आहेत असं म्हणत त्यांनी जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो असे विधान पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीवर कुणी बोलत नाही असे म्हणत भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेनेच्या नादाला लागू नका 

बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यापूर्वी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई मंचावर बोलत आहेत. यावेळी त्यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज ठाकरे स्वतः दुपारी बारा वाजता उठतात आणि यांना कसला सकळाच्या भोंग्याचा त्रास होतो असे म्हणत ते म्हणाले की, शिवसेनेच्या नादाला लागू नये असे म्हणत शिवसेनेची ताकद आज सर्वांना दिसली आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारे आमचे हिंदुत्व आहे असे सुभाष देसाई म्हणाले.

महिला वर्गाची संख्या लक्षणीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासभेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात बीकेसी मैदानात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या सर्वामध्ये लक्षणीय बाब म्हणजे सभेसाठी महिला वर्गाची मोठी संख्या मैदानाकडे जाताना पाहण्यास मिळत आहे.

कल्याण डोंबिवलीतून 100 हून अधिक बस रवाना

मुख्यमंत्री उ्द्धव ठाकरे यांची संध्याकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच सभेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. तप दुसरीकडे सभेसाठी कल्याण डोंबिवलीमधून जवळपास 100 हून अधिक बसेस कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी मैदानावर (BKC Ground) जाहीर सभा होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून (Shiv sena) जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे (UddhaV Thackeray) नेमकं कुणावर हल्लाबोल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा लावून धरला आहे. एवढेच नव्हे तर आजपर्यंतच्या सभांमध्ये राज ठाकरेंनी वेळोवेळी भोग्यांच्या मुद्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे राज यांना नेमकं कसे उत्तर देतात हे महत्त्वाचे असणार आहे. त्याशिवाय भाजपकडूनदेखील (BJP) वेळोवेळी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या सर्व गोष्टींचा नेमका समाचार उद्धव ठाकरे कसा घेणार हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार असून, ओवैसींनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिल्याने निर्माण झालेल्या वादावरही मुख्यमंत्री काय भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT