eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मृत शेतकऱ्याच्या कुटुंबालाही मदत

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन काही घोषणा करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहोत. बार्टीच्या ८६१ जणांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा शिंदेंनी केली. ८६१ जणांच्या फेलोशीपपोटी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा खर्च होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाँग मार्चदरम्यान मृत पावलेल्या पुंडलिक जाधव या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिल्याचं सांगितलं आहे. मृत पुंडलिक जाधव यांच्या कुटुंबियांना यावेळी मुख्यमंत्री ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

पुढे बोलतांना मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी भाष्य केलं. ते म्हणाले की, इंदू मीलमध्ये होणारं स्मारक हे जागतिक दर्जाचं होत आहे. आपण परदेशात जातो. परंतु परदेशातील लोक बघायला येतील, असं स्मारक इंदू मीलमध्ये उभा राहात असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं.

यासह वंचित, पीडित घटकातील नागरीक हक्कांसापून, शिक्षणापासून दूर राहू नयेत, यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचं शिंदेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थप्पड प्रकरणातून हरभजन सिंगने कमावले कोट्यवधी रुपये, श्रीसंतचा मोठा दावा

Dhule Solapur Highway Accident : अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; 18 वर्षीय तरुणीला ट्रकनं चिरडलं, 250 फुटांपर्यंत नेलं फरफटत

IPL 2026 : मुंबई इंडियन्स कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची हकालपट्टी केव्हा करणार? दिग्गज खेळाडूचा थेट सवाल

UP ATS: आजोबा आझाद हिंद फौजेत, पण नातू निघाला दहशतवादी! नोएडाच्या तुषार चौहानचा 'हिजबुल्लाह' कसा झाला?

Metro 5 : कल्याण ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावणार, १८ हजार कोटींच्या निधीला मंजूरी; कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT