Ahmednagar News 
महाराष्ट्र बातम्या

Ahmednagar News: बोअरवेलमध्ये पडलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar News: अहमदनगर येथील कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चिमुकला साडेआठ तास बोअरवेलमध्ये अडकला होता. (Child dies 5 year old boy fell in borewell in ahmednagar kopardi)

कोपर्डी येथील काकासाहेब सुद्रिक यांच्या बोअरवेलमध्ये हा मुलगा पडल्याची माहिती आहे. या बोअरवेलमध्ये तब्बल ११ फूट खाली हा चिमुरडा अडकला होता. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामन दलाचे जवान दाखल झाले मात्र त्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाना अपयश आले.

टीव्ही ९ हिंदी या वृत्तवाहिनीनुसार, या मुलाला मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली आहे.

सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. या मुलाला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू होतं. एनडीआरएफच्या पाच पथकाकडून बचाव कार्य सुरू होते.

संदीप सुद्रिक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगाराचा हा पाच वर्षांचा मुलगा आहे. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price Crash: सोनं 3200 तर चांदी 3800 रुपयांनी स्वस्त; भाव आणखी किती घसरणार?

Harshwardhan Sapkal : एवढा खोटारडा पंतप्रधान देशाने यापूर्वी कधीही पाहिला नाही...!

Latest Marathi News Live Update : धाराशिव- तुळजापूर -सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

Horoscope Prediction : दिग्गज कलाकाराचा मृत्यू ते ट्रम्पची सत्ता धोक्यात ! 2026 साठी ज्योतिषाची महत्त्वाची भविष्यवाणी

Ladki Bahin Yojana : लाखो महिलांना मोठा दिलासा! 'लाडकी बहीण' योजनेतील ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती; सप्टेंबर, ऑक्टोबरचे हप्ते खात्यात जमा होणार

SCROLL FOR NEXT