child labor survey stop
child labor survey stop 
महाराष्ट्र

अफवांमुळे थांबले बालकामगारांचे सर्वेक्षण 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : सोशल मीडियावर सध्या मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा व्हायरल झाल्याने राज्याच्या विविध भागांत संशयावरून अनेक जणांचा नाहक बळी गेला आहे. गावोगावी नवखा माणूस दिसला, की त्याच्याकडे संशयाने पाहिले जात असून, याचा फटका बालकामगारांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणावर झाला आहे. या अफवेमुळे सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांनाही गावकऱ्यांकडून धक्‍काबुक्की झाली. त्यामुळे हे कामच थांबवावे लागले आहे. 

बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. 9 ते 14 वर्षे वयोगटातील बालमजुरांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाची गोडी लावून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या प्रकल्पांतील शाळांमधून केले जाते. अशा बालकामगारांचा शोध घेण्यासाठी जिल्हाभरात एप्रिलमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले. मात्र, काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळ्या आल्यात, अशी अफवा पसरल्यामुळे संशय वाढला आहे. लहान मुलांसोबत बोलताना बघितल्यामुळे तीन शिक्षकांना लोकांनी धक्‍काबुक्‍की केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे तूर्तास सर्वेक्षण थांबविण्यात आले. 

एप्रिल आणि मे महिन्यात तालुका सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुले पळवणारी टोळी समजून बांधून ठेवण्यात आल्याच्या घटनाही घडल्या. यापुढे कर्मचाऱ्यांसोबत अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या अफवांचे भूत शांत झाल्यानंतरच रखडलेले सर्वेक्षण पूर्ण करण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. 

ग्रामीण भागात रखडले सर्वेक्षण 
बालकामगार प्रकल्पांतर्गत आतापर्यंत चार ते पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये जवळपास चार हजार बालकामगारांचा शोध घेण्यात आला. मात्र, अफवांमुळे कुणी अनोळखी गावात दिसल्यास कुठल्याही प्रकारची चौकशी न करता त्याला मारहाण केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये सर्वेक्षणाचे काम रखडले आहे. 

शिक्षकांमध्ये भीती 
प्रकल्पातील शिक्षकांकडून करण्यात येणारे सर्वेक्षण हे 9 ते 14 वयोगटातील मुलांशी संबंधित असल्यामुळे लहान मुले पळवून नेणारी टोळी समजून शिक्षकांनाच थेट या टोळीतील समजून पडेगाव, ढोरकीन आणि अन्य एका गावात बांधून ठेवण्यात आले होते. यामुळे सद्यःस्थितीत गावांमध्ये जाण्याबद्दल भीती व्यक्‍त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT