NCP Ajit Pawar  sakal
महाराष्ट्र बातम्या

Chinchwad By Election: माझी विनंती आहे की....चिंचवड प्रचारसभेत अजित पवारांनी कलाटेंना दिला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरु झालाय. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बंडखोरी करत राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. कलाटे यांच्या या भूमिकेवर भाष्य करत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एक विनंती केली आहे. (Chinchwad By Election Ajit Pawar Rahul Kalate mahavikas aghadi )

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मविआचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारारार्थ अजित पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत राहिल आहेत. यावेळी अजित पवार बोलत होते. वाल्हेकरवाडीत मेळावा सुरु आहे.

काय म्हणाले अजित पवार?

महाविकासआघाडीत चर्चा करुनत नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

तसेच, अपक्ष उमेदवारी फॉर्म आहे, पण इथे मविआचाच उमेदवार जिंकून येणार. ती मंत शिवसैनिकांची आहेत हे विसरु नका असा टोलाही यावेळी पवारांनी राहुल कलाटेंना लगावला.

यासोबत त्यांनी माझी विनंती आहे की कोणी रुसु नका फुगु नका. असे विधानदेखील केले.

यासोबत अजित पवार यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला. ज्यांनी बंड केला त्यांचा शिवसेना तयार करण्यात खारीचाही वाटा नाही. असा दावा अजित पवार यांनी केला.

राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे चिंचवड विधानसभेतले राजकारण ढवळून निघाले आहे. या बंडखोरीचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT