BJP Chitra Wagh esakal
महाराष्ट्र बातम्या

Chitra Wagh: सत्तारांच्या विधानानंतर चित्रा वाघ यांना आठवली कंगना रणौत

संतोष कानडे

मुंबईः कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रसंगी कंगना रणौत यांच्यावर झालेल्यी टीकेची आठवण करुन दिली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांबद्दल अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे. मुळात पन्नास खोक्यांच्या मुद्द्यावरुन हे भांडण सुरु झालं. तरीही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंगना रणौतवरही खालच्या स्तरावर टीका केली होती. कंगनाला खालच्या शब्दांमध्ये हिणवण्यापर्यंत यांची मजल गेलेली, अशी आठवण चित्रा वाघ यांनी करुन दिली. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वाघ यांना लाईव्हमध्येच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन कट केला.

हेही वाचा : का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT