महाराष्ट्र

विखे यांचा वारसदार निवडा; काँग्रेस श्रेष्ठींचे अशोक चव्हाण यांना पत्र

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : राधाकृष्ण विखे पाटील यांचा कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांचा वारसदार तातडीने निवडावा, असे आदेश कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीपूर्वी तांत्रिकदृष्ट्या अंतिम असलेल्या पावसाळी अधिवेशनात कॉंग्रेसचा नवा विरोधी पक्षनेता असेल. या पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्याचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर आमदारांची बैठक बोलवावी आणि नव्या नेत्याची निवड करावी, अशा आशयाचे पत्र अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पाठविल्याचे सूत्रांकडून समजले. राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन अखेरचे असून त्यानंतर विधानसभा निवडणुका होतील. त्यामुळे लवकरात लवकर नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान नगरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसला सोडण्यास नकार दिल्यामुळे नाराज विधिमंडळ पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपतर्फे निवडणूक लढविली. तेव्हापासूनच विखे पाटील यांच्या कॉंग्रेसमधील भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह लागले होते. नगरच्या जागेसाठी कॉंग्रेसकडून योग्य प्रकारे वाटाघाटी झाल्या नसल्याची नाराजी व्यक्त करणाऱ्या विखे पाटील यांनी आडवळणाने प्रदेश नेतृत्वालाही लक्ष्य केले होते. तसेच कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्याचे टाळून पक्षश्रेष्ठींकडे पदाचा राजीनामा पाठवून दिला होता. 

आक्रमक चेहऱ्याची गरज

निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारला धारेवर धरू शकेल, अशा ज्येष्ठ आणि आक्रमक धरणारा आक्रमक चेहऱ्याची कॉंग्रेसला आवश्‍यकता आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मेस आहे. त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकेल, असे कॉंग्रसमधून सांगितले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT