Kolhapur-Flood 
महाराष्ट्र बातम्या

महापुराने नागरिकांची मनेही उद्‌ध्वस्त!

नेत्वा धुरी

मुंबई - कोल्हापूरनजीकच्या हरिपूरमधील राजेश शिर्के सात दिवस पुरात अडकले होते. आयुष्यभर कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यांदेखत वाहून जात होता आणि ते काहीही करू शकत नव्हते. घराच्या पहिल्या मजल्यावर जीव मुठीत धरून राहिले होते ते. कुटुंबात ती भयभावनाही ते व्यक्त करू शकत नव्हते. आठवडाभराने सुटका झाली त्यांची. पण, त्यांना एवढा मानसिक धक्का बसला होता, की सुटका झाल्यानंतर ते त्यांचे नावही नीट सांगू शकत नव्हते. एकच वाक्‍य ते सतत म्हणत होते, ‘मी मरणाच्या दारातून परतलो...’

अशाप्रकारे महापुराचा मानसिक धक्का बसलेले ते एकटेच नाहीत. महापुराच्या काळात मीरजच्या एका वैद्यकीय छावणीत असे आठ हजार नागरिक दाखल झाले होते. त्यातील काहींची मानसिक अवस्था तर याहून गंभीर होती. पूर ओसरल्यानंतर मिरजच्या शासकीय रुग्णालयात असे नवे सहा हजार रुग्ण दाखल झाले. त्या महापुराने केवळ घरेदारेच उद्‌ध्वस्त केली नाहीत, तर हजारो नागरिकांना अशाप्रकारे मनोमन ध्वस्त केले.     

अशा प्रकारच्या नागरिकांवर मीरजच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तेथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले, की साध्या-साध्या तक्रारी घेऊन आलेल्या पुरग्रस्तांचेही समुपदेशन करुन त्यांच्यातील मानसिक धक्का बसलेली व्यक्ती ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT