Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेनी "वाचून" दाखवली राहुल गांधींवरची टीका; लिहून दिलं की लिहून आणलं? चर्चेला उधाण

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने देशभर गदारोळ सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींचा समाचार घेतला. मात्र यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना लिहून दिलेलं वाचावं लागत होतं. शिंदेंनी राहुल गांधींवरची टीका वाचून दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी वाचून दाखवलेले मुद्दे

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळेच आज आपण आणि राहुल गांधी स्वातंत्र्य उपभोगत आहेत

  • राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहावं, परंतु त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा कराव्यात

  • ते वारंवार सागतात, मी सावकर नाही मी गांधी आहे. तुम्ही काय सावरकर होणार? त्यासाठी त्याग आणि प्रेम असावं लागेल

  • तुम्ही परदेशात जावून देशाची बदनामी करता, त्यामुळे तुमच्याडून काय अपेक्षा करणार?

  • सावरकर हे केवळ महाराष्ट्राचं दैवत नसून संपूर्ण देशाचे दैवत आहेत. तरीही अधिवेशनात राहुल गांधींच्या विरोधात 'त्यांनी' एकही शब्द काढला नाही

  • ठाकरे म्हणाले, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. परंतु अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार?

  • आम्ही विधानसभेच्या बाहेर केलेलं आंदोलन म्हणजे संताप आहे. चुकीच्या विधानांमुळे आलेली ती चीड आहे

  • सावरकरांचं देशाप्रती जे काम आहे, त्यांच्या समर्पित भावाची आठवण म्हणून राज्यभर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे

उद्धव ठाकरेंनी मालेगाव मधील सभेत केलेल्या विधानावर शिंदे म्हणाले, तुम्ही सावकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार आहात, उशिरा सुचलेले शहाणपण असतं त्या प्रमाणे हे बोलले गेले. फक्त बोलून काय होणार काय होणार आहे तुमच्या कृतीतून ते दिसलं पाहिजे. असं शिंदे म्हणाले. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बाबत केलेल्या विधानावरून राज्यभर सावरकर प्रेमी निषेध करत आहेत, कारण सावरकर हे देश भक्त होते, त्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून दिलं, असं शिंदे म्हणाले.

दरम्यान, पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कागद वाचून मुद्दे सांगितल्याने त्यांना कुणी लिहून दिलं होतं की त्यांनीच ते लिहून आणलं होतं? असे प्रश्न सोशल मीडियामध्ये उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : अहमदाबादचं नामांतर कधी? उद्धव ठाकरेंना कळली संघाची अंदर की बात! अमित शहा आणि मोदींबद्दल दिली मोठी अपडेट

Parliament Winter Session: १९ दिवस १५ बैठका अन्... संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार; पाहा संपूर्ण तपशील

UPSC IFS Main Exam 2025: UPSC IFS मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; आता असे करा डाउनलोड

AUS vs IND, 5th T20I: मॅक्सवेलने झेल सोडला अन् अभिषेक शर्माने इतिहास घडवला; सूर्यकुमार अन् केएल राहुलला टाकलं मागे

Latest Marathi News Live Update : शितल तेजवानी राहत्या घरातून फरार; फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांनंतर परदेशात पलायनाची शक्यता

SCROLL FOR NEXT