Crime News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News: हळदी सभारंभात नाचताना धक्का लागल्यामुळं दोन गटात राडा! हळदीच्या मंडपात रक्ताचा...

हळदीच्या कार्यक्रमात दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं

सकाळ डिजिटल टीम

हळदी सभारंभात डीजेवर नाचताना धक्का लागल्यामुळे दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना भिवंडी शहरात घडली आहे. धारदार शस्त्र, लोखंडी रॉड, फरशीने एकमेकांवर हल्ला करत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील अंजूर फाटा येथील साठे नगरमधील एका लग्नाच्या मंडपात घडली आहे. (Latest Marathi News)

या घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन जाधव, कैलास धोत्रे, दिनेश मोरे, संदीप उदमेले, राजू गुंजाळ ( सर्व रा.साठेनगर भिवंडी ), संजय जाधव ,अक्षय जाधव (दोघे रा.फेणेगाव,कामतघर) अशी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केलेल्या तरुणांची नावे आहेत. तर संजय जाधव, अक्षय जाधव, दिनेश मोरे व अजय चव्हाण अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.(Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जाधव यांच्या नातेवाईकाकडे हळदी सभारंभ होता. त्यावेळी संजय हा त्याचे मित्र अक्षय आणि राजू यांच्या सोबतीने हळदी सभारंभाला आला होता. याच दरम्यान परिसरात हळदीचा कार्यक्रम असल्याने दुसऱ्या गटातील दिनेश हा त्याचे मित्र लखन, कैलास, संदीप यांच्यासोबत आला होता.

यावेळी हळदीनिमित्ताने बँड आणि डीजेच्या तालावर काही तरुण नाचत होते. नाचताना एकमेकांना धक्का लागल्यामुळे किरकोळ वाद झाला. याच रूपांतर मोठ्या वादात झालं. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दिनेशच्या आत्यालाही विरोधी गटातील संजय आणि अक्षयने शिवीगाळ केली.(Latest Maharashtra News)

या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झालं. या वादात धारदार शस्त्र, लोखंडी रॉड, फरशीने दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये संजय, अक्षय, दिनेश आणि अजय हे चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT