Sandip Deshpande_Rupali Thombre 
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या ईडी कारवाईवरुन मनसेच्या आजी-माजी नेत्यांमध्ये जुंपली

श्रीधर पाटणकर यांच्या ११ फ्लॅटवर ईडीनं जप्ती आणली होती, त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवरुन राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यात आता मनसेच्या दोन आजी-माजी नेत्यांनीही यावर भाष्य केलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसे सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या रुपाली ठोंबरे-पाटील हे ट्विटरवर एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसून आलं. (clashesh between Sandip Deshpande Rupali Thombare Due to EDs action on Shridhar Patnakar)

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या मालमत्तेवर ईडीचे अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दुनियादारी या मराठी सिनेमातील एक सीन असलेली व्हिडिओ क्लीप ट्विटरवर अपलोड करत पाहुणे आले घरापर्यंत अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. त्यांच्या या ट्विटवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी कमेंट केली. त्यांनी म्हटलं की, "हे पाहुणे स्वतःहून आलेले नाहीत, त्यांना पाठवण्यात आलं आहे. सत्तापिपासू आहेत, सतत केंद्र सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. पण आम्ही लढू आणि जिंकू ही!"

पुष्पक बुलियन ग्रुपच्या ठाण्यातील निलांबरी आपार्टमेंटमधील ११ फ्लॅटवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जप्तीची कारवाई केली. हे सर्व फ्लॅट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकिचे आहेत. थेट मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळच्या नातेवाईकावर ईडीनं कारवाई केल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. भाजपनं या कारवाईचं स्वागत करत आता कोणाचीही सुटका नाही, असं भाजप नेते किरिट सोमय्या यांनी म्हटलं होतं. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं ही कारवाई सुडबुद्धीनं केल्याचा आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

Anna Hazare : लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर संवादातून प्रश्न सोडवावेत; अण्णा हजारे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Delhi Police: 'ते' साध्या वेशातील लोक खरंच पोलिस होते का? दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी काढले कडक आदेश

Mumbai Local : कसारा मार्गावरील गर्दीला अखेर दिलासा; सप्टेंबरपासून १५ डब्यांच्या लोकलचा होणार विस्तार

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

SCROLL FOR NEXT