महाराष्ट्र बातम्या

Coronavirus: एक्‍स्प्रेस गाड्यांची रेल्वेकडून स्वच्छता

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना विषाणूची बाधा टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या मध्य रेल्वेच्या एक्‍स्प्रेस गाड्यांमधील साहित्याची स्वच्छता करण्यात येत आहे. लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांमधील वातानुकूलित डब्यांमधील पडदे, बेडशिट, ब्लॅंकेटच्या स्वच्छतेसाठी मध्य रेल्वेच्या मेन्टेनन्स डेपोकडून ते हटवून संपूर्ण स्वच्छता करण्यात येत आहे.

रेल्वे मंत्रालयाने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वे विभागाने विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेल्वे स्थानकांवर कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे फलक लावण्यात आले आहेत; तर उपनगरी गाड्यांमध्ये तसेच रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेसंबंधी उद्‌घोषणा केल्या जात आहेत. उपनगरी गाड्यांमधील हॅंडल, खांब, लोखंडी सळ्या, खिडक्‍या, आसनांचे निर्जंतुकीकरण केले जात असून या गाड्या आतून-बाहेरून धुतल्या जात आहेत.

लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेस गाड्यांमध्येही कामगारांकडून स्वच्छता केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शौचालय, गाडीतील स्वच्छता, खिडक्‍या आणि आसनांची स्वच्छता केली जात आहे. गाडीतील तिकीट तपासणीसांनाही यासंदर्भातील सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्यासह वातानुकूलित डब्यांमधील पडदेही काढण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: गडकरींचा शब्द, पण वास्तव वेगळं! मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण, निकृष्ट कामांमुळे संताप, डेडलाईन धोक्यात..

Vidarbha Heatwave : तापमानाच्या चाळिशीने विदर्भ हैराण; एप्रिल महिन्यात १८ दिवस तापदायक अनुभव

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जमीन मोजणीला शेजारचा विरोध करीत असल्यास काय करावे? मोजणीसाठी ५९० शेतकऱ्यांनी पोलिसांना मोजले ३० लाख रुपये, वाचा...

आजचे राशिभविष्य - 05 मे 2026

खाकीमागे दडलेले संघर्षमय जीवन! आरोपींच्या शोधात वडापावावर काढावे लागतात दिवस; वर्षातील १०० दिवस कुटुंबापासून दूर हजारो किमी प्रवास अन्‌ गाडीतच झोप

SCROLL FOR NEXT